Snake Bite 7 Times: तुम्ही चित्रपटांमध्ये अनेकदा पाहिलं असेल की जर एखादी व्यक्ती सापाची हत्या करते, तर नागिण त्याचा सूड उगवते. असाच एक हैराण करणारा दावा उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून एका व्यक्तीने केला आहे. रामपूर जिल्ह्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने दावा केला आहे की, आपल्या साथीदाराच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी एका नागिणीने 7 वेळा दंश केला. व्यक्तीचा विचित्र दावा… या व्यक्तीने दावा केला आहे की, जितक्या वेळा सापाने त्याला दंश केला तितक्या वेळेत कुटुंबीय त्याला रुग्णालयात घेऊन जात होते. व्यक्ती म्हणाला की, प्रत्येक वेळेस तो मृत्यूपासून वाचत होता. मात्र आता तो दहशतीत जगत आहे. पुढे तो म्हणाला की, त्याला घराबाहेर जाऊन मजुरी करण्याची भीती वाटते. कधी साप त्याच्यावर हल्ला करेल याची त्याला भीती वाटते. हे ही वाचा- अज्ञात आजारामुळे परिसरात घबराट; 7 चिमुरड्यांच्या मृत्यूनंतर आईस्क्रिम, कोल्ड ड्रिंक्सची विक्री बंद मिर्झापूर गावात राहणाऱ्या एहसान अलीने सांगितलं की, 7 महिन्यांपूर्वी तो आपल्या शेतात काम करण्यासाठी गेला होता. यादरम्यान त्याला सापाची एक जोडी दिसली. त्याने या जोडीने काठीने हल्ला केला. ज्यात एका सापाचा जागेवरच मृत्यू झाला. दुसरा साप येथून बचाव करून पळाला होता. यानंतर ते आपल्या घरी आले होते. सतत 7 वेळा सापाने केला हल्ला.. एहसानने दावा केला की, यानंतर सातत्याने सापाने तिच्यावर हल्ला केला. सहा महिन्यांपूर्वी पहिला हल्ला झाला होता. त्यावेळी तो शेतात काम करीत होता. येथे त्याला सापाने दंश केला. यानंतर त्याची प्रकृती बिघडली आणि घरातील लोकांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेलं. येथे उपचारानंतर त्याचा जीव वाचवण्यात आला. बुधवारी सकाळी शेतात सापाने त्याला सातव्यांदा दंश केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.