मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /बापरे! एकाच ठिकाणी सापडले तब्बल 132 साप, गावकऱ्यांनी घाबरून सगळ्यांना केलं ठार

बापरे! एकाच ठिकाणी सापडले तब्बल 132 साप, गावकऱ्यांनी घाबरून सगळ्यांना केलं ठार

बुलढाण्यात खोदकाम करताना तब्बल 132 साप आढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांनी या सर्व सांपाना ठार मारलं आहे.

बुलढाण्यात खोदकाम करताना तब्बल 132 साप आढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांनी या सर्व सांपाना ठार मारलं आहे.

बुलढाण्यात खोदकाम करताना तब्बल 132 साप आढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांनी या सर्व सांपाना ठार मारलं आहे.

बुलडाणा 02 मे : राज्यात कोरोनामुळे लोकांची भीती वाढत असताना बुलढाण्यामध्ये मात्र नागरिक वेगळ्याच कारणाने घाबरले आहेत. बुलढाण्यात खोदकाम करताना तब्बल 132 साप आढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांनी या सर्व सांपाना ठार मारलं आहे. खरंतर सर्प शेतकऱ्यांच्या शत्रू नसून तो त्यांचा मित्र आहे. पण गावकऱ्यांनी या सांपाना विषारी समजून ठार केलं.

विषारी आणि बिनविषारीच्या गैरसमजुतीतून बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे इथे गावकऱ्यांनी नाली खोदनकाम करताना आढळलेल्या तब्बल 132 सापांना भीतीपोटी ठार केलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

साप म्हटलं की कोणाच्याही पोटात गोळा येईल. साप चावल्यास मनुष्य मरतोच, या गैरसमजातून सापांना मारलं जातं. परंतु सापांचे निसर्गातील स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय संस्कृतीत सर्पांना देवांचे स्थान असून, नागपंचमीला नागाची मनोभावे पूजा केली जाते. पण प्रत्यक्षात घरात, परिसरात आदी ठिकाणी कोणत्याही जातीचा साप आढळल्यास नागरिकांकडून त्याची हत्या केली जाते.

PHOTOS : लॉकडाऊनमध्ये 200 किमी अंतरावरून दिसलं हिमालय पर्वतरांगेचं मनमोहक दृश्यं

असाच गंभीर प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे या गावात घडला आहे. इथे ग्रामपंचायत नालीचं खोदकाम सुरू असताना एक-दोन नव्हे तर चक्क 132 लहान मोठे साप आढळून आले. हे पाहून गावकऱ्यांचा आणि काम करणाऱ्या मजुरांचा थरकाप उडाला. अश्यावेळी कुणीही सर्पमित्रांना पाचारण न करता सर्व सापांना ठार केलं. इतकंच नाही तर मेलेल्या सापांची मोजणी करून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही केले. यानंतर सर्पमित्र घटनास्थळी पोहोचले आणि तपासणी केली असता हे साप पानदीवड जातीचे असून ते पूर्णपणे बिनविषारी होते.

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, 2 जवान शहीद

शास्त्रज्ञांच्या दृष्टीने जगात सर्पांच्या तीन हजार जाती आढळतात. भारतात त्यातील 330 सापाच्या जाती आहेत. यापैकी 69 सापांचे प्रकार विषारी आहेत. 29 जाती समुद्रात व 40 जाती समुद्राबाहेर आढळतात. पिंपळगावात घडलेली दुर्दैवी घटना सारखी स्थिती बदलण्यासाठी आणि आढळलेला साप विषारी की बिनविषारी हे समजण्यासाठी नागरिकांमध्ये आजही जनजागृतीची आवश्‍यकता असल्याचं दिसून येतं.

साऱ्या जगापासून लपून 'किम जोंग' बनवत होता TikTok व्हिडीओ? वाचा काय आहे सत्य

संलकन, संपादन - रेणुका धायबर

First published:
top videos