अभिनेत्री समीरा रेड्डी गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मुंबईत सुरू असलेल्या लॅक्मे फॅशन वीक २०१९ मध्ये अनेक दिवसांनी समीराने हजेरी लावली. यावेळी समीराने बेबी बंपसह एण्ट्री घेतली.
समीराने २०१४ मध्ये व्यावसायिक अक्षय वर्देशी लग्न केलं. २०१५ मध्ये ती एका मुलाची आई झाली. आता समीरा दुसऱ्यांदा आई व्हायला सज्ज झाली आहे.
ऐश्वर्या राय बच्चन आपल्या गरोदरपणाच्या काळात फार चर्चेत होती. गरोदरपणात तिला अनेकदा अभिषेकसोबत कार्यक्रमात पाहण्यात आलं आहे. ऐश्वर्याने २०११ मध्ये आराध्याला जन्म दिला. गरोदर असताना ऐश्वर्याच्या वजनात कमालिची वाढ झाली होती. यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आलं होतं.
राणी मुखर्जीने २०१४ मध्ये मुलीला आदिराला जन्म दिला. राणीने तिच्या गरोदरपणाची बातमी अनेक महिने लपवून ठेवली. जेव्हा ती एका कार्यक्रमात पाहुणी म्हणून गेली तेव्हा ती गरोदर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तेव्हा राणीचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. नंतर तिच्या नणंदने ती गरोदर असल्याचे सांगितले.
सैफ अली खानची बहीण आणि अभिनेत्री सोहा अली खाननेही तिचे गरोदरपणातले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. एवढंच नाही तर सोहाने गरोदरपणात करायचे योग व्हिडिओही शेअर केले. २०१७ मध्ये सोहाने इनायाला जन्म दिला.
गरोदरपणात कोंकणा सेन शर्मा सार्वजनिक कार्यक्रमात फक्त बेबी बंपसह दिसलीच नाही तर तिने एका मासिकासाठी फोटोशूटही केलं. कोंकणाच्या या निर्णयाचं तेव्हा साऱ्यांनीच कौतुक केलं. २०११ मध्ये तिने मुलाला जन्म दिला.
करिन कपूर खानने दोन वर्षांपूर्वी तैमूरला जन्म दिला. २०१६ मध्ये करिनाने लॅक्मे फॅशन वीकमध्ये बेबी बंपसह रॅम्प वॉक केला होता. रॅम्प वॉक करताना पोटत बाळाने लाथ मारली का असा प्रश्न करिनाला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ती म्हणाली की, ‘मी एवढी घाबरलेले होते की, मला कळलंच नाही असं काही झालं की नाही.’ यावेळी करिनाने सब्यसाचीचा ड्रेस घातला होता.