मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Fixed Deposit मध्ये पैसे ठेवलेल्यांसाठी आनंदाची बातमी, पाहा RBI ने काय घेतलाय निर्णय

Fixed Deposit मध्ये पैसे ठेवलेल्यांसाठी आनंदाची बातमी, पाहा RBI ने काय घेतलाय निर्णय

FD मध्ये पैसे ठेवणाऱ्यांसाठी गुडन्यूज! RBI च्या या निर्णयामुळे वाढू शकतात रिटर्न्स

FD मध्ये पैसे ठेवणाऱ्यांसाठी गुडन्यूज! RBI च्या या निर्णयामुळे वाढू शकतात रिटर्न्स

FD मध्ये पैसे ठेवणाऱ्यांसाठी गुडन्यूज! RBI च्या या निर्णयामुळे वाढू शकतात रिटर्न्स

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई: प्रत्येक जण आपल्या कमाईतील थोडी रक्कम ही फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवत असतो. पहिली प्रायोरिटी FD करण्याला दिली जाते. FD ही अत्यंत सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. त्यामुळे बऱ्याचदा त्यावर कमी रिटर्न मिळून सुद्धा लोक त्यात गुंतवणूक करण्यावर भर देतात. तुम्ही जर पैसे FD मध्ये ठेवले असतील किंवा गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

आरबीआयच्या बुलेटिनमध्ये फिक्स डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ करण्याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. अलीकडच्या काळात एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. यामागचं कारणही तसंच आहे. RBI ने रेपो रेट वाढवले त्यामुळे कर्ज आणि EMI महाग झाले. यासोबत FD वरील व्याजदरातही वाढ केली आहे.

तुम्ही जर मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला पुढील महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) चांगली बातमी मिळू शकते. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या आरबीआयच्या बुलेटिनमध्ये असे म्हटले आहे की ठेवींचा आधार वाढवण्यासाठी बँकांमध्ये स्पर्धा वाढत आहे आणि म्हणूनच ते मुदत ठेव (एफडी) दर देखील वाढवत आहेत. मे 2022 पासून, पॉलिसी व्याजदरात सुमारे 220 आधार अंकांची वाढ झाली आहे. बँका त्यांच्या ठेवींचे दर सातत्याने वाढवत आहेत.

RBI ने सलग 6 वेळा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. सरकारी किंवा नॅशनल बँकांच्या तुलनेत सहकारी किंवा कॉ ऑपरेटिव्ह बँका एफडीवर आकर्षक किंवा जास्त व्याजदर देतात. मात्र त्यामध्ये जोखीमही खूप जास्त असते. बँक बुडाली किंवा अडचणी आल्या तर तुम्हाला पैसे मिळण्यात अडचणी निर्माण होतात.

आरबीआयने या बुलेटिनमध्ये लिहिले आहे की, "काही आठवड्यांपूर्वीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत सध्या उत्पन्न वक्र पाहता, पुढील परिस्थिती आव्हानात्मक दिसते." जागतिक मॅक्रो वातावरण आणि बँकिंग संकट पाहता आरबीआयने हे सांगितले आहे. आरबीआयने असेही म्हटले आहे की भारत कोरोनासारख्या महासंकटावर मात करून बाहेर आला आहे. कृषी क्षेत्राची हंगामी वाढ, उद्योगांमध्ये सुधारणा आणि सेवा क्षेत्राला गती मिळाल्याने हे शक्य झाले. मात्र, महागाईत सातत्याने वाढ होत असल्याबद्दल आरबीआयनेही चिंता व्यक्त केली.

यूएस बँकिंग संकटाबाबत चिंताजनक परिस्थिती असतानाही, विश्लेषकांचा अंदाज आहे की आरबीआय व्याजदरात 25 आधार अंकांनी वाढ करू शकते. एप्रिल महिन्यात होणाऱ्या बैठकीत ही वाढ दिसून येईल. यानंतर रेपो दर 6.75% वर पोहोचेल. एप्रिलमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची ही वाढ झाली तर मे 2022 नंतर रेपो रेटमध्ये ही सलग सातवी वाढ होईल.

पुन्हा जर रेपो रेट वाढला तर सगळ्या बँकांची कर्ज महाग होण्याची शक्यता आहे. त्यासोबत बँका FD च्या व्याजदरातही वाढ करू शकतात. त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये काय घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

First published:
top videos

    Tags: Money, Saving bank account, Savings and investments