औरंगाबाद,ता.27 जून: औरंगाबाद पोलीस उपायुक्तांवर नोकरीचं आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. राहुल श्रीरामे असं पोलीस उपायुक्तांचं नाव आहे. महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या २२ वर्षांच्या मुलीला नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा श्रीरामे यांच्यावर आरोप आहे. पोलीस आयुक्तालयाच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर पीडित तरुणीनं तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल श्रीरामे दीर्घ रजेवर आहेत. फेब्रुवारी २०१८ ते जून २०१८ या कालावधीत हा प्रकार घडल्याचं मेसेजमध्ये नमूद करण्यात आलं आहे. प्रोझोन मॉल समोरील मिलेनीयम पार्क अपार्टमेंटमधील श्रीरामे यांच्या फ्लॅटमध्ये हा प्रकार घडला. सद्रक्षणाय,खलनिग्रहाय असं पोलीसांचं ब्रिदवाक्य आहे. चांगल्या माणसांचं रक्षण करणं आणि गुन्हेगारांचं निर्दालन करणं हे पोलीसांचं कर्तव्य आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारीच अशा गुन्ह्यात अडकला असेल तर पोलीसांच्या वर्दीलाच डाग लागल्याची भावना पोलीस दलात व्यक्त होत आहे. हेही वाचा…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







