राज ठाकरे स्वतःला कोर्टापेक्षा मोठे समजतात काय? - रामदास कदम

राज ठाकरे स्वतःला कोर्टापेक्षा मोठे समजतात काय? - रामदास कदम

प्लास्टिकबंदीवरून मनसेनं टीका केली होती. त्याला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलंय. कोर्टापेक्षा राज ठाकरे स्वत:ला मोठे समजतात काय अशी टीका त्यांनी केली.

  • Share this:

मुंबई, ता.25 जून : राज्यात लागू झालेल्या प्लॅस्टिक बंदीवरून आता राजकारणाला सुरूवात झाली आहे. प्लास्टिकबंदीवरून मनसेनं टीका केली होती. त्याला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलंय. कोर्टापेक्षा राज ठाकरे स्वत:ला मोठे समजतात काय अशी टीका त्यांनी केली.

प्लास्टिक बंदीबाबत आदित्य ठाकरे आग्रही होते. आदित्य ठाकरे पुढे जातील या भीतीनं राज ठाकरे राजकारण करत आहेत असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणी राज यांना काही शंका असतील तर त्यांनी शिष्टमंडळ घेऊन माझ्याकडे यायला पाहिजे होतं. मी त्यांच्या सर्व शंकांना उत्तरं दिली असती असंही कदम म्हणाले.

रामदास कदम यांच्या या टीकेमुळे प्लास्टिक बंदीवरून मनसे आणि शिवसेनेत हल्लाबोल होण्याची शक्यता आहे. प्लास्टिक बंदीवरून निर्माण झालेल्या शंकांना उत्तर देण्यासाठी रामदास कदम यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषद बोलावली होती. गणेशोत्सवाच्या काळात थर्माकोलचा वापर करावा की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी एक हायपॉवर कमेटी स्थापन करण्यात आली आहे.

ही कमेटी चर्चा आणि अभ्यास करून निर्णय देईल अशी माहितीही कदम यांनी दिली. प्लास्टिक बंदीचा निर्णय हा 9 महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. त्याचवेळी प्लास्टिक आणि थर्मोकोल उत्पादकांनी पर्याय शोधायला पाहिजे होता त्यामुळं त्यांची जबाबदारी सरकारवर येत नाही असंही रामदास कदम यांनी स्पष्ट केलं.

पर्यावरणाचा ह्रास करणाऱ्या प्लास्टिक ला हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात शनिवारपासून प्लास्टिक बंदी ला सुरुवात केली. पर्यावरण विभागाने प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीची अधिसूचना प्रसिद्ध केली.

पहिल्या दिवसाची कारवाई, लाखोंचा दंड वसूल

पुणे- 3 लाख 69 हजार

नाशिक - 3 लाख 60 हजार

पिंपरी-चिंचवड - 3 लाख 40 हजार

सोलापूर - 2 लाख 15 हजार

नागपूर - 1 लाख 55 हजार

कोल्हापूर - 45 हजार

सांगली - 40 हजार

भिवंडी - 40 हजार

First published: June 25, 2018, 6:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading