आज १८ एप्रिलला देशभरातील दुसऱ्या टप्यातील निवडणुकांचं मतदान होत आहे. दरम्यान, दक्षिणेतून निवडणूकांसंदर्भातले फार चांगले फोटो समोर येत आहेत. एकीकडे सर्व स्टार मतदान करायला येत आहेत, तर थलायवा रजनीकांतही स्टेला मॅरिस कॉलेजमध्ये मतदान करायला पोहोचले.
सिनेसृष्टीप्रमाणेच रजनी यांनी राजकीय मैदानातही उडी घेतली आहे. मात्र यावेळी त्यांनी निवडणूक लढवली नाही.
श्रुती हसन आपल्या वडिलांसोबत कमल हसन यांच्यासोबत मतदानाला हजर होती. यावेळी तिने आपल्या आयडी कार्डसोबत फोटो दिला
कॉलिवूड अभिनेते आणि मक्कल निधी मैयम चीफ कमल हसन यांनी मतदान केल्यानंतर अशा अंदाजात प्रसारमाध्यमांना फोटो दिला.
मतदान करण्यासाठी कॉलिवूड स्टार ज्योतिका, सूर्या आणि कार्थीही आले होते. मतदान केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना पोझ दिल्या.