डीएसकेंच्या पाठीशी उभे राहा- राज ठाकरेंचं गुंतवणूकदारांना आवाहन

डीएसकेंच्या पाठीशी उभे राहा- राज ठाकरेंचं गुंतवणूकदारांना आवाहन

नोटबंदीमुळे आर्थिक गर्तेत सापडलेल्या डिएसकेंना पाठिंबा दर्शवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाहीरपणे पुढे आलेत. डीएसकेंकडे पैसे अडकलेल्या गुंतवणूकदारांनी आज पुण्यात राज ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरेंनी डीएसकेंची बाजू घेत या गुंतवणूकदारांना थोडं थांबण्याचा सल्ला दिला.

  • Share this:

24 नोव्हेंबर, पुणे : नोटबंदीमुळे आर्थिक गर्तेत सापडलेल्या डिएसकेंना पाठिंबा दर्शवण्यासाठी मनसे  अध्यक्ष राज ठाकरे जाहीरपणे पुढे आलेत. डीएसकेंकडे पैसे अडकलेल्या गुंतवणूकदारांनी आज पुण्यात राज ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरेंनी डीएसकेंची बाजू घेत या गुंतवणूकदारांना थोडं थांबण्याचा सल्ला दिला. डीएसकेंसारखा एखादा मराठी उद्योजक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला आला असेल आपण त्याला साथ दिली पाहिजे, पैसे देण्यासाठी डीएसकेंना आपण आणखी थोडा वेळ दिला पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडलीय.

गुंतवणूकदारांच्या बैठकीत राज ठाकरेंनी डीएसकेंवर विश्वास ठेवा, त्यांच्या पाठीशी उभं राहा, असं आवाहन गुंतवणूदारांना केलंय. डीएसके हे सध्या आर्थिक अडचणीत सापडले असले तरी ते फसवणूक करणाऱ्यांपैकी नाहीत, आपल्या राज्यात सध्या मराठी व्यवसायिकांना संपवण्यासाठी एक लॉबी कार्यरत असून काही राजकारणीही त्यामध्ये सामील असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला.

गेल्या काही दिवसांमधे डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णींवर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले असून आर्थिक गुन्हे शाखा त्याचा तपास करत आहे. डीएसकेंना कर्ज देणाऱ्या अनेक बँकांनी डीएसकेंच्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे. या महिन्याच्या 30 तारखेला डीएसकेंच्या अटकपूर्व जामीनावर पुन्हा सुनावणी होणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर डीएसकेंच्या पाठीशी राज ठाकरे उभे राहिले आहेत. डीएसकेंच्या साडे आठ हजार हजार गुंतवणूकदारांपैकी सातशे ते आठशे गुंतवणूकदार राज ठाकरेंसोबतच्या या बैठकीला उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2017 02:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading