
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सध्या रिलॅक्स मुडमध्ये आहेत. राजकारणातून वेळ काढून ते अनेकदा सुट्टीवर जात असतात. त्यांच्या या सुट्टीवर जाण्याची बरीच चर्चाही होते.

राहुल सध्या सुट्टीवर आपल्या आवडत्या राज्यात हिमालच प्रदेशात आहेत. चंदिगढवरून कारने ते मंगळवारी शिमल्यात आलेत. त्यावेळी सोलन इथल्या थाब्यावर ते काळी काळ थांबले होते. त्यावेळी त्यांना भूक लागली होती. त्यांनी तिथे मॅगी चा आनंद घेतला आणि ते पुढच्या प्रवासाला निघाले.

राहुल यांच्यासोबत त्यांची बहिण प्रियंका आणि त्यांची दोन मुलही आहेत. राहुल आणि प्रियांका शिमल्या जवळच्या छराबडा इथल्या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत.

सोलन इथल्या धाब्यावर राहुल थांबले आहेत हे कळताच काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्तेही राहुल यांन भेटण्यासाठी धाब्यावर आलेत. त्यांनाही राहुल यांनी वेळ दिला आणि स्थानिक राजकारणाची माहिती घेतली.

यावेळी राहुल यांनी कार्यकर्त्यांना दिल्लीतल्या निवासस्थानी येऊन भेटा असंही सांगितलं. यावेळी कार्यकर्त्यांनी आणि धाब्यातल्या कामगारांनी त्यांच्यासोबत फोटोही काढले.

प्रियांका गांधी यांनीही कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि कार्यकर्त्यांनी प्रियांकासोबथ सेल्फी काढाल्या.

शिमल्या जवळच्या छराबडा इथं प्रियांका गांधी घर बांधत आहेत. त्या घराच्या बांधकामाचीही प्रियांका आणि राहुल यांनी पाहणी केली. सोनिया गांधी यांच्याही आवडीची ही जागा असून त्याही सुट्टीसाठी इथे येत असतात.




