मर्डर मिस्ट्री सोडवणार नवाझुद्दीन सिद्दीकी; Raat Akeli Hai Trailer रिलीज

मर्डर मिस्ट्री सोडवणार नवाझुद्दीन सिद्दीकी; Raat Akeli Hai Trailer रिलीज

Raat Akeli Hai 31 जुलैला ऑनलाइन रिलीज होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 17 जुलै : रात अकेली है (Raat Akeli Hai) फिल्मचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ही एक क्राइम थ्रिलर फिल्म आहे. 31 जुलैला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज (Netflix) होणार आहे. नेटफ्लिक्सवर 16 जुलैला 17 फिल्स आणि वेब सीरिजची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकीच एक 'रात अकेली है' चित्रपट. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

या ट्रेलरमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि राधिका आपटे (Radhika Apte) यांचा यामध्ये जबरदस्त अभिनय दिसून आला आहे.

हा चित्रपट म्हणजे एक मर्डर मिस्ट्री आहे. एका नेत्याची हत्या झाली आहे आणि त्याची हत्या कुणी केली त्याच्या तपासावर आधारित चित्रपटाचं पूर्ण कथानक आहे. चित्रपटात नवाझुद्दीन पोलिसाच्या भूमिकेत आहेत. जे या हत्येचा तपास करत आहेत. जटिल यादव असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव. 'नाम याद रखना इन्स्पेक्टर जटिल यादव' अशा दमदार डायलॉगसह या ट्रेलरमध्येच नवाझुद्दीन यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

नवाझुद्दीन यांच्यासह राधिका आपटे, आदित्य श्रीवास्तव, श्वेता त्रिपाठी, इला अरुण, खालिद तैय्यबजी, शिवानी रघुवंशी आणि तिग्मांशू धूलियादेखील महत्त्वपूर्ण अशा भमिकेत दिसणार आहेत. हनी त्रेहन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

हे वाचा -  Netflix ची धमाकेदार घोषणा! 17 ओरिजिनल चित्रपट-सीरिज करणार प्रदर्शित

नेटफ्लिक्सवर 17 नवीन प्रोग्राम येणाऱ्या काळात भारतीयांना पाहायला मिळणार आहेत. भारतीय इंडस्ट्रीमध्ये नेटफ्लिक्सवरील कंटेटसाठी दोन वर्षांसाठी 3000 कोटींची रक्कम गुंतवण्यात आल्याची माहिती नेटफ्लिक्सचे संस्थापक Reed Hastings यांनी त्यांच्या मागील भारत दौऱ्यादरम्यान सांगितले होते. यामध्ये अनुराग बासू यांचा राजकुमार राव, अभिषेक बच्चन स्टारर 'लुडो', संजय दत्त स्टारर 'टोरबाज',  राधिका आपटे आणि नवाझुद्दीन सिद्दिकी यांचा थ्रिलर 'रात अकेली है', कोंकणा सेन आणि भूमि पेडणेकर यांचा 'डॉली किट्टी और चमकते सितारे', यामी गौतम आणि विक्रांत मैसीचा 'गिन्नी वेड्स सनी' हे चित्रपट नेटफ्लिक्सवर चाहत्यांच्या मनोरंजनासाठी येणार आहेत.

Published by: Priya Lad
First published: July 17, 2020, 6:08 PM IST

ताज्या बातम्या