• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • येतोय पब्जीचा अपग्रेड वर्जन; निर्मात्यांनी केली PUBG New State अल्फाची घोषणा

येतोय पब्जीचा अपग्रेड वर्जन; निर्मात्यांनी केली PUBG New State अल्फाची घोषणा

या गेमची प्री-रजिस्ट्रेशन्स (Pre-Registrations) खुली झाल्यानंतर काहीच दिवसांत पब्जीच्या क्लोज्ड अल्फा टेस्टिंगची घोषणा करण्यात आली आहे.

 • Share this:
  मुंबई 22 मे: 'पब्जीन्यू स्टेट' (PUBG New State)या पब्जी मोबाइल गेम सिक्वेलच्या क्लोज्ड अल्फा टेस्टिंगची (Closed Alpha Testing) घोषणा करण्यात आली आहे. हा सिक्वेल (Sequel) येणार असल्याची घोषणा फेब्रुवारी महिन्यात करण्यात आलीहोती. बॅटल ग्राउंड्स मोबाइल इंडिया (Battlegrounds Mobile India)या गेमची प्री-रजिस्ट्रेशन्स (Pre-Registrations) खुली झाल्यानंतर काहीच दिवसांत पब्जीच्या क्लोज्ड अल्फा टेस्टिंगची घोषणा करण्यात आली आहे. 'पब्जीन्यू स्टेट'च्या क्लोज्ड अल्फा टेस्टिंगची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ या गेमच्या डेव्हलपर्सनी प्रसिद्ध केला असून, हे टेस्टिंग लवकरच सुरू होणारअसल्याची घोषणा त्यांनी केली आहे. क्राफ्टॉन (Krafton)हे या गेमचे डेव्हलपर आहेत. हे टेस्टिंग पहिल्यांदा अमेरिकेत सुरू होणार असल्याचं या व्हिडिओवरून निश्चित झालं आहे. त्यानंतर युझर्सच्या प्रतिसादानुसारजगातल्या विविध प्रदेशांमध्ये हे टेस्टिंग खुलं केलं जाणार आहे. हे अल्फाटेस्टिंग सुरुवातीच्या टप्प्यात तरी अँड्रॉइड युझर्ससाठीच उपलब्ध असेल.येत्या काही दिवसांत आयओएस अॅप सपोर्टसंदर्भातील माहिती जाहीर होण्याचीशक्यता आहे. यासाठी पात्र असलेल्या प्लेयर्सना पब्जी न्यू स्टेट हागेम ऑफिशियल रिलीजपूर्वी खेळायची संधी मिळणार आहे. त्यात काही बग्जआढळल्यास त्याची माहिती त्यांना देता येणार आहे. बॅटल रॉयल (Battle Royale)या आगामी गेमचं अल्फा टेस्टिंग2021च्या दुसऱ्या तिमाहीत सुरूहोणार असल्याची घोषणा कंपनीने केली होती. पब्जी न्यू स्टेट या गेमचीप्री-रजिस्ट्रेशन्स फेब्रुवारी2021पासून सुरू झाली आहेत. त्यानंतर गुगलप्ले स्टोअरवर एक कोटीहून अधिक जणांनी या गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन केलंआहे. पब्जी न्यू स्टेट म्हणजे पब्जी2.0हा गेम2051मध्ये सेटकरण्यात आला आहे. पब्जी मोबाइलप्रमाणेच पब्जी मोबाइल न्यू स्टेट हागेमदेखील नवी शस्त्रं आणि दारूगोळ्यासह येणार आहे. त्यात ड्रोन्स,कॉम्बॅटरोल्स,इत्यादींचा समावेश असेल. पब्जी न्यू स्टेटचा मॅप8x8एवढा मोठाअसेल. हा मॅप एक्स्प्लोअर करण्यासाठी प्लेयर्स चालू,धावू शकतात किंवावाहनांचा वापर करू शकतात. पब्जी न्यू स्टेट हा गेम भारतात रिलीज(India Release)होणार की नाही,याबद्दल अजून तरी अधिकृतपणे काही जाहीरकरण्यात आलेलं नाही. बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया हा गेम भारतात कधी लाँचकरायचा,यावर क्राफ्टॉन कंपनी काम करत आहे. हा गेम भारतात10जून रोजीलाइव्ह होणार असल्याचं बोललं जात आहे. लवकरच याबद्दल कंपनीकडून अधिकृतघोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
  First published: