हिंगणघाट आणि औरंगाबाद घटनेच्या निषेधार्थ आज वर्धा बंदची हाक; नागरिक, सामाजिक संघटना उतरणार रस्त्यावर

हिंगणघाट आणि औरंगाबाद घटनेच्या निषेधार्थ आज वर्धा बंदची हाक; नागरिक, सामाजिक संघटना उतरणार रस्त्यावर

औरंगाबाद जळीतकांडातील पीडीत महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. औरंगाबादच्या सिल्लोडमधील अंधारी गावात या महिलेला गावातील बिअरबार मालकाने घरात घुसून पेटवलं होतं.

  • Share this:

वर्धा, 06 फेब्रुवारी : हिंगणघाट येथील प्राध्यापिका आणि औरंगाबाद येथल्या महिला जळीत प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज वर्धा शहरात सर्वपक्षीय मोर्चा व कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. मोर्चात शहरातील शाळा महाविद्यालयाचे विध्यार्थी तसेच सर्वपक्षीय नागरिक, सामाजिक संघटना आज रस्त्यावर उतरणार आहे.

औरंगाबाद जळीतकांडातील पीडीत महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. औरंगाबादच्या सिल्लोडमधील अंधारी गावात या महिलेला गावातील बिअरबार मालकाने घरात घुसून पेटवलं होतं. यात महिला 95 टक्के भाजली होती. महिलेवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र 95 टक्के भाजल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या दोन्ही घटनांवर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त करण्यात आला. यावर अनेक राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना गृहमंत्री अनिल देशमुखांनी मात्र वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. औरंगाबादमधील सिल्लोडमधल्या पीडितेवर गृहमंत्री अनिल देशमुखांनी संतापजनक विधान केलं आहे. पीडिता आणि आरोपीचे संबंध होते. दोघांमधल्या संबंधातून घटना घडल्याची शक्यता गृहमंत्री अनिल देशमुखांनी व्यक्त केली. प्रेमसंबंध असो किंवा नसो, ते पाहणं गृहमंत्र्यांचं काम नाही, अशी टीका विरोधकांनी केली आहे. स्त्री आणि पुरुषात संबंध असले तरी तिला जाळण्याचा अधिकार कुणालाही नाही अशी भावना सर्वसामान्य व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या - मृत्यूची झुंज अपयशी, औरंगाबाद जळीत प्रकरणातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्य

'आरोपींना पकडा आणि फटकवा'

महिलांवरील अत्याचार खपवून घेणार नाही, आरोपींना पकडा आणि फटकवा असे आदेशच मी पोलिसांना दिलेत असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले आहेत. मंत्रालय वार्ताहार संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पण प्रश्न असा निर्माण होतो, की राज्याच्या प्रमुखांनीच पोलिसांना कायदा न पाळण्याचा सल्ला द्यावा का. कारण आरोपींना पकडून मारणं हे पोलिसांचं काम नाही, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना कोर्टात हजर करणं हे पोलिसांचं काम आहे अशी प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

इतर बातम्या - भीमा कोरेगाव : माजी न्यायाधीश पी.बी. सावंत मोदी सरकारवरविरोधात आक्रमक

First published: February 6, 2020, 7:14 AM IST

ताज्या बातम्या