मुंबई, 25 नोव्हेंबर: राज्यात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी झाल्याने शहरी भागात 8 ते 12वी आणि ग्रामीण भागात पाचवी ते 12वीचे वर्ग सुरू झाले आहेत. आता राज्यात प्राथमिक शाळा सुरू (Maharashtra Primary School reopen) कऱण्याची मागणी जोर धरत आहे. या संदर्भात टास्क फोर्सने सुद्धा महत्त्वाचा सल्ला राज्य सरकारला (Maharashtra Government) दिला आहे. शाळा सुरू करण्याच्या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सुद्धा महत्तवाची माहिती दिली होती. त्यानुसार आता राज्यभरात प्राथमिक शाळा सुरु (primary school opening date in maharashtra) करण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात येत्या 1 डिसेंम्बरपासून प्राथमिक शाळा (primary school reopening in maharashtra) सुरु करण्याच्या प्रस्तावाला कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता आठवी ते बारावीबरोबरच प्राथमिक शाळा म्हणजेच पहिली ते सातवीच्या शाळाही सु रु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Exam Tips: तुम्हालाही बोर्डाच्या परीक्षेत Merit मध्ये यायचंय? मग या गोष्टी कराच
काय होता टास्क फोर्सचा सल्ला
प्राथमिक शाळा, दिव्यांग शाळा आणि बोर्डिंग शाळा सुरू करता येतील असं टास्क फोर्सने राज्य सरकारला सल्ला दिला होता. पीडियाट्रिक टास्क फोर्स ने सुचवल्या काही उपाय योजना सुचवल्या होत्या. बोर्डिंग स्कुल म्हणजेच निवासी शाळा मध्ये येताना मात्र आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट बंधनकारक करावा असा सल्ला देण्यात आला होता.
काय म्हणाल्या शालेय शिक्षण मंत्री
"ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या शाळा सुरु आहेत त्यामुळे आता ग्रामीण भागात पहिली ते चौथी शाळा सुरु होणार आहेत. तर शहरी भागात सध्या आठवी ते बारावीच्या शाळा सुरु आहेत म्हणूनच आता शहरी भागात पहिली ते सातवीच्या शाळा सुरु होणार आहेत. आम्ही विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आरोग्यमय वातावरण देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. शाळांनीहे विद्यार्थ्यांची संपूर्ण काळजी घ्यावी." असं शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी म्हंटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, महाराष्ट्र