कणकवली 13 जुलै: मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात बांधण्यात आलेल्या कणकवलीतील नव्या फ्लायओव्हरचा मोठा भाग सोमवारी दुपारी कोसळला. हा भाग कोसळताना तिथून जाणारे दोन वाहनचालक सुदैवाने बचावले त्यामुळे जिवितहानी टळली. मात्र या पुलाचं बांधकामच सदोष असल्यामुळे या नव्या पुलाला जागोजागी आधार देण्यात आले आहेत. हे आधार दिले असले तरी हा पूल केव्हाही कोसळून गंभीर दुर्घटना होण्याची भीती आहे. एकूणच या घटनेमुळे हायवे बांधकामातला भ्रष्टाचार उघड्यावर आला आहे.
पूल कोसळताच कणकवलीकर आक्रमक झाले असून आमदार नितेश राणे यानी अधिकाऱ्यांना दिला इशारा दिला आहे. पूलाचा मोठा भाग कोसळल्याचे लक्षात येताच कणकवलीकर नागरिकानी हायवेवर धाव घेतली आणि वाहनचालकाना सतर्क करीत वाहतूक तातडीने बंद केली . भाजपाचे आमदार नितेश राणे हे देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
वारंवार या निकृष्ट दर्जाबाबत सांगूनही हायवे ठेकेदार जुमानत कसा नाही याबद्दल कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्यावर आमदार राणे चांगलेच भडकले. आताच्या आता हा धोकादायक पूल कोसळून टाका आणि नागरिकांच्या जिवाशी खेळू नका असे राणे म्हणाले तसेच जोपर्यंत स्ट्रकचरल ऑडिट होउन पूल सुरक्षित असल्याचे हायवे विभागाकडून लेखी दिले जाणार नाही तोपर्यंत सिंधुदुर्गातल्या हायवेवरुन एकही वाहन जाउ देणार नसल्याचा इशाराही भाजपा आमदार नितेश राणे यानी दिलाय.
शीश झुकाके नत मस्तक हूँ मैं! Corona शी लढणारे अमिताभ बच्चन झाले भावुक
गेल्याच वर्षीच्या पावसाळ्यात 4 जुलै रोजी नितेश राणे यानी हायवेच्या निकृष्ट कामाचा जाब विचारत महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल ओतून त्याना पावसात हायवेच्या कामाची पाहणी करण्यास लावले होते. त्यात त्यांच्यासह 18 जणाना अट्कही झाली होती. त्याची सुनावणी अजून सुरु झालेली नाही . त्यातच नितेश यानी पुन्हा हा इशारा हायवे ठेकेदार आणि अधिकाऱ्याना दिल्यामुळे येत्या काळात हायवेच्या निकृष्ट बांधकामाविरोधात कणकवलीत तीव्र आंदोलने होण्याची शक्यता आहे.
हायवेच्या निकृष्ट बांधकामामुळे जागोजागी पूरपरिस्थिती सिंधुदुर्गातील हायवेच्या कामाचा ठेका मध्यप्रदेशच्या दिलीप बिल्डकॉन कंपनीकडे देण्यात आलेला आहे. परंतू कोकणातल्या पावसाचा विचार करता या हायवेचे काम अनेक ठिकाणी इतके सदोष झालेले आहे की यावर्षी पाउस सुरु झाल्यापासून हायवेलगत असणाऱ्या वस्त्यांमध्ये वारंवार पूर परिस्थिती निर्माण होत आहे.
मुंबई, पुण्यात होता बॉम्बस्फोटांचा कट, ISKPच्या दहशतवादी योजनेचा झाला पर्दाफाश
हायवेसाठी टाकण्यात आलेल्या भरावामुळे पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बंद झाले असून हे पाणी गावात शिरण्याच्या घटना वाढल्या आहेत. तसेच या नव्या हायवेवरही अनेक ठिकाणी पाणी तुंबत असल्यामुळे वेगात असणाऱ्या वाहनचालकांचे गंभीर अपघात होत आहेत. या सगळ्या घटनामुळे सिंधुदुर्गातील नागरिक प्रचंड संतापले असून येत्या गणेश चतुर्थीच्या आधी हायवे सुस्थितीत झाला नाही तर हायवेचे अधिकारी आणि ठेकेदाराविरोधात नागरिकांचा तीव्र उद्रेक होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.