Home /News /news /

नकाशा बदलल्यानंतरही शांत नाही नेपाळ, रेडिओवर सुरू आहे भारताविरोधी भाषणं

नकाशा बदलल्यानंतरही शांत नाही नेपाळ, रेडिओवर सुरू आहे भारताविरोधी भाषणं

काही दिवसांपूर्वीच नेपाळच्या संसदेने एक नवीन नकाशा मंजूर केला होता. ज्यात त्यांनी भारताच्या या तीन क्षेत्रांना स्वतःचे घोषित केलं आहे.

    नवी दिल्ली, 21 जून: नेपाळच्या रेडिओ चॅनलवर कलापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरावर काठमांडूचा दावा असल्याचा प्रसार सुरू आहे. नेपाळच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी यासंबधी माहिती दिली आहे. खरंतर काही दिवसांपूर्वीच नेपाळच्या संसदेने एक नवीन नकाशा मंजूर केला होता. ज्यात त्यांनी भारताच्या या तीन क्षेत्रांना स्वतःचे घोषित केलं आहे. नेपाळच्या या नकाशाला दोन्ही सभा आणि राष्ट्रपतींनीही मान्यता दिली आहे. नेपाळच्या या वागण्यावर भारतानेही तीव्र निषेध व्यक्त केला आहे. हा नकाशा कृत्रिम तपशील पुरावा आणि ऐतिहासिक वस्तुस्थितीवर आधारित नाही आणि मान्य नाही, असं भारताकडून सांगण्यात आलं आहे. नेपाळी वाहिन्यांवर सुरू असलेल्या गाण्यांमध्ये भारतविरोधी भाषणं सुरू असल्याची माहिती पिथौरागड धारचुला इथे उपविभागातील दंतू गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने दिली आहे. ते म्हणाले की, सीमावर्ती भागात राहणारे लोक नेपाळी गाणी ऐकतात. सध्या सुरू असलेल्या या गाण्यांमध्ये नेपाळी नेत्यांनी भारतविरोधी भाषणं केल्याचं ऐकायला मिळत आहे. या दरम्यान भारतविरोधी सामग्री प्रसारित करणारी मुख्य एफएम वाहिनी म्हणजे नवीन नेपाळ आणि कलापानी रेडिओ आहे. ते म्हणाले की, काही जुन्या चॅनेल मल्लिकार्जुन रेडिओ, एक अन्नपूर्णा आणि ऑनलाइनदेखील 'कलापानी हे नेपाळचे क्षेत्र आहे' असा प्रसार सुरू आहे. भारताविरोधात प्रसार करणारी ही एफएम स्टेशन्स नेपाळच्या धारचूला जिल्हा मुख्यालयाजवळ चबरीगार इथे आहेत. स्टेशनची सीमा सुमारे तीन किलोमीटर आहे आणि सीमेच्या भारतीय भागामध्ये धारचूला, बाळूवाकोट, जौलजीबी आणि काली इथंही ऐकू येतं. संपादन - रेणुका धायबर
    First published:

    पुढील बातम्या