मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कृषी कायदे, अग्नीवीर आंदोलनात सक्रीय सहभाग, नक्षलवाद्यांची पत्रातून खळबळजनक कबुली

कृषी कायदे, अग्नीवीर आंदोलनात सक्रीय सहभाग, नक्षलवाद्यांची पत्रातून खळबळजनक कबुली

कृषी कायदे-अग्नीवीर विरोधात नक्षलवाद्यांचा सक्रीय सहभाग

कृषी कायदे-अग्नीवीर विरोधात नक्षलवाद्यांचा सक्रीय सहभाग

देशात कृषी कायद्याविरुद्ध झालेल्या आंदोलन आणि अग्नीवीर योजनेविरोधात झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवल्याचे स्वतः नक्षलवाद्यांनी आपल्या पत्रकात मान्य केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 21 सप्टेंबर : देशात कृषी कायद्याविरुद्ध झालेल्या आंदोलन आणि अग्नीवीर योजनेविरोधात झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवल्याचे स्वतः नक्षलवाद्यांनी आपल्या पत्रकात मान्य केलं आहे. सोबतच सरकारच्या धोरणाविरुद्ध जिथे रोष आहे, अशा आंदोलनात शिरून आपलं नक्षलवादी नेटवर्क मजबूत करण्याची नवीन रणनीती त्यांनी आखली आहे, .यासाठी महाराष्ट्रातील शहरी भागांना माओवाद्यांनी लक्ष केलं असल्याने महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहे.

न्यूज 18 लोकमतच्या हाती कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) यांचे प्रसिद्ध पत्र लागलं आहे. या प्रसिद्धी पत्रामध्ये त्यांनी दिल्ली येथे कृषी कायद्याच्या विरोधात लांबलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये आपला सक्रिय सहभाग असल्याचे कबूल केले. सोबतच अग्नीवीर योजनेच्या विरोधात देशभरात जो तरुणांचा संताप उसळलेला होता काही ठिकाणी रेल्वे जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या, त्या घटनांमध्ये देखील आमचा सहभाग असल्याचे नक्षलवाद्यांनी कबूल केलं आहे.

21 सप्टेंबर 2004 रोजी कम्युनिस्ट सेंटर आणि सीपीआय एमएल (पीपल वार) या दोन संघटनांचे विलीनीकरण होऊन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) उदयास आली. आज या विलयाला बरोबर 18 वर्षे पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर 21 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या काळात माओवादी विलय सप्ताह साजरा करत आहे. त्या पार्श्वभूमीवर काढलेले हे परिपत्रक आहे. यात "स्ट्रॅटेजी अँड प्रॅक्टिस ऑफ इंडियन रेवोल्युशन" चा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो.

काय आहे स्टेटस जी अँड प्रॅक्टिस ऑफ इंडियन रेवोल्युशन?

हे भारतातील माओवादी चळवळीचे लिखित दस्तावेज आहे. या पुस्तकात माओवाद्यांबद्दल खरी व अस्सल माहिती उपलब्ध आहे. माओवाद्यांना काय साध्य करायचे आहे? आणि ते निश्चित कोणत्या प्रकारे साध्य करणार आहे? हे अत्यंत स्पष्टपणे या पुस्तकात नमूद केलेले आहे.

या रणनीतीनुसार नक्षलवाद्यांनी शहरी भागामध्ये पाय पसरायला सुरुवात केली आहे. शहरी भागातील तरुण, बेरोजगार, कामगार, सामाजिक धार्मिक संघटना शहरात सरकारच्या विरोध होणारे आंदोलन या सर्व ठिकाणी नक्षलवादी आपल्या युनायटेड फ्रंट माध्यमातून शिरकाव करत आहे. ताजी उदाहरण बघायची असेल तर कृषी कायद्याच्या विरोधात देशभरात झालेले शेतकरी आंदोलन किंवा भीमा कोरेगाव येथे झालेला हिंसाचार ही ताजी उदाहरणे आहेत. ज्याचा नक्षलवादी स्वतः उघडपणे स्वीकार करतात, त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी देखील शहरी नक्षलवादावर लक्ष केंद्रित करत आपली रणनीती बदलवलेली आहे.

First published: