Mumbai: आपल्यापैकी अनेक जणांचे न्यू इयर रिझोल्यूशन आता सेट असतील. कित्येक जण नवीन वर्षात जिम लावण्याचे, वजन कमी करण्याचे ठाम संकल्प करतात. शरीराची जास्त हालचाल न होणे, तणाव वाटणे, खूप वेळ एका ठिकाणी बसून राहणे अशा अनेक कारणांमुळे आपल्या वजनात झपाट्याने वाढ होते.
पोट सुटणे ही समस्या तर निम्म्या लोकांना असते. जिम लावण्यापूर्वी प्रत्येकालाच प्रश्न पडतो की आपले वजन कमी होण्यासाठी नक्की कोणते व्यायाम महत्त्वाचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पोटाची चरबी कमी करण्यासाठी जिम मध्ये गेल्यावर कुठले व्यायाम करायला हवेत.
फिट वाईब जिमचे फिटनेस कोच संदीप सुंदर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, कुठली ही जिम लावण्यापूर्वी सर्वसामान्यांची एकच गरज असते. ती म्हणजे कमीत कमी वेळात वजन कमी करायचे आहे. तर साधारण वजन कमी करण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. त्यात नियमित व्यायाम त्याचप्रमाणे डाएटचा समावेश असतो.
अनेक जण वजन कमी करण्यासाठी झुंबा, कार्डिओ या व्यायाम प्रकारांचा जास्त उपयोग करतात. परंतु वजन कमी करण्यासाठी वजन उचलण्याचा व्यायाम करणे अधिक फायदेशीर असते. वजन उचलण्याचे विविध व्यायाम केल्याने वेट लॉस सोबत मसल लॉस होत नाही. त्याचप्रमाणे बेली फॅट कमी करण्यासाठी पुढील व्यायाम अतिशय फायदेशीर ठरेल.
बेंच प्रेस: हा व्यायाम केल्यास चेस्ट, शोल्डर व ट्रायसेपचा व्यायाम होतो. वेट लॉस करण्याबरोबरच मसल स्ट्रेंथ देखील वाढते. जेणेकरून वजन कमी करण्यास मदत होते.
डेड लिफ्ट: बॅक, हिप्स व थाय यांच्यावर चांगला परिणाम होतो. त्याचप्रमाणे हा व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील भरपूर कॅलरीज बर्न होतात. हा व्यायाम प्रकार केल्याने फॅट लॉस होण्यास मदत होते.
बारबेल स्कॉट: हा व्यायाम प्रकार तुमचा गाभा मजबूत करतो. या व्यायामात थाय मसल, हॅमस्ट्रिंग, काल्फ, हिप व कोअर मसल वर चांगला परिणाम होतो. जेणेकरून वजन कमी होण्यास मदत होते.
लॅटरल फ्रैक्शन: हा व्यायाम वजन उचलून जेल जातो. या व्यायाम प्रकारात कमरेजवळील फॅट कमी होण्यास मदत होते.
रनिंग: रनिंग हा कार्डिओ व्यायाम आहे. ज्यात धावल्यामुळे शरीरातील भरपूर कॅलरीज बर्न होतात. आपली स्ट्रेंथ वाढते व वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.
फास्ट फीट: फास्ट फीट व्यायाम प्रकार स्टेप बोर्डच्या सहाय्याने केला जातो. यात पूर्ण बॉडी सामील होते. म्हणजेच लोअर बॉडी, अप्पर बॉडी व कोअर मसल सामील होतात. या व्यायाम प्रकारामुळे भरपूर कॅलरीज बर्न होतात. व वजन कमी होण्यास मदत होते.
फिटनेस ट्रेनर संदीप सुंदर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हे व्यायाम प्रकार करताना आपल्या कोचचे आपल्यावर लक्ष असणं गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी नियमितपणा असणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे.