जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / कुख्यात गुंड विजय मोहोडची नागपुरात हत्या

कुख्यात गुंड विजय मोहोडची नागपुरात हत्या

कुख्यात गुंड विजय मोहोडची नागपुरात हत्या

कुख्यात गुंड विजय मोहोडची हत्या झाली असल्याची माहिती रविवारी रात्री वाऱ्यासारखी संपूर्ण नागपूर शहरात पसरली.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नागपूर, 17 जून: नागपूरात कुख्यात गुंड विजय मोहोड याची हत्या करण्यात आली आहे. अपहरण करून विजय मोहोड याची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हत्या झाल्यानंतर विजयचा मृतदेह नागपूर शहराबाहेर शंकरपूर इथं फेकून देण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचं वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलीस आणि क्राईम ब्रांच घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विजय मोहोड हा नागपूरच्या हुडकेश्वर येथील नरसाला गावात राहणार आहे. त्या भागात विजयची मोठी दहशत होती. विजय मोहोडने गँगस्टर मारुती नव्वाचं अपहरण करुन त्याची मारहाण केली होती. या घटनेनंतर विजयच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. कुख्यात गुंड विजय मोहोडची हत्या झाली असल्याची माहिती रविवारी रात्री वाऱ्यासारखी संपूर्ण नागपूर शहरात पसरली. त्यानंतर पोलिसांकडून विजयचा शोध घेण्यात आला. त्यानंतर सोमवारी सकाळच्या सुमारास शंकरपूर इथं विजयचा मृतदेह सापडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय राऊत, काल्या, बॉबी धोटे, दिलीप ठवकर याचबरोबर अन्य काही आरोपींची नावं पुढे आली आहेत. हत्या झाल्यानंतर आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत आहेत. तर क्राईम ब्रांचही या प्रकरणात आरोपींचा शोध घेत आहे. दरम्यान, पोलिसांनी विजयचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांनी आता सगळीकडे चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. प्रकरणाची अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून स्थानिकांची आणि विजयच्या मित्रांची चौकशी करण्यात येणार आहे. VIDEO : कार्यकर्ते भडकले, भरसभेत नेत्यांना कपडे फाटेपर्यंत धुतले

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात