उत्तर प्रदेशमध्ये मुंबईहून जाणारी पुणे पटना ट्रेन थांबवण्यात आली आहे. तब्बल 3000 लोक या ट्रेनमधून प्रवासी करत होते.
कोरोना व्हायरसचा जगभरात कहर सुरू आहे. भारतात 260 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर महाराष्ट्रातही 63 लोक कोरोनानं बाधित आहे. याच पार्श्वभूमिवर आज संपूर्ण देशामध्ये जनता कर्फ्यूचं पालन केलं जात आहे. पण अशात सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे मुंबईवरून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या '01101 पुणे पटना' स्पेशल ट्रेनला उत्तर प्रदेशच्या चंदोली स्थानकात थांबवण्यात आलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अनेक प्रवासी पुण्यातून आपल्या घरी आले आहेत. त्यांची तपासणी सध्या सुरु आहे.
खरंतर जगभरात 11 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या महाकाय आजारावर मात करण्यासाठी भारतात आज जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे.