मुंबई, 05 मे: राज्यातील मशिदींवरील (mosques ) अनधिकृत भोंगे काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंनी दिलेला अल्टिमेटम काल संपल्यानंतर राज्यभरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी मशिदीबाहेर हनुमान चालीसाचं पठण केलं. काल दिवसभरात पोलिसांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांची (MNS activists) धरपकड सुरुच होती. या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या मौलवींनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतल्या 26 मशिदींच्या मौलवींनी पहाटेची अजान भोंग्याविना करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येतेय. दक्षिण मुंबईतील जवळपास 26 मशिदींच्या मौलवींनी पहाटेची अजान भोंग्याविना करण्याचा निर्णय घेतला असल्याचं जाहीर केलं आहे. दक्षिण मुंबईतील जवळपास 26 मशिदींच्या मौलवी आणि धर्मगुरूंची बुधवारी रात्री उशिरा बैठक झाली. Vastu: घरामध्ये घड्याळ लावताना या चुका करू नका; दिशा चुकली तर अनेक गोष्टी बिघडतात मौलवी आणि धर्मगुरू यांच्यात झालेल्या बैठकीत या बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत यापुढे पहाटेची अजान लाउडस्पीकर शिवाय केली जाईल असा ठराव संमत करण्यात आला. सुन्नी बडी मशिदीमध्ये या संदर्भातील बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला भायखळाच्या मदनपुरा, नागपाडा आणि आग्रीपाडा येथील मुस्लीम धर्मगुरू सहभागी झाले होते. या बैठकीत ठरवण्यात आलं की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर न करता मशिदींमध्ये अजान केली जाईल. यानंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन करत मुंबईतील प्रसिद्ध मिनारा मशिदीत पहाटेची अजान आज लाऊडस्पीकर विना करण्यात आली आहे. राज ठाकरेंची आक्रमक भूमिका ज्या मशिदीत मौलवी ऐकणार नाहीत , तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लागणार असा इशारा यावेळी राज ठाकरेंनी दिला आहे. तसंच अनधिकृत गोष्टींना तुम्ही अधिकृत परवानगी देताय, कशासाठी, कोणासाठी देताय. हा विषय फक्त सकाळच्या अजानपुरता नाही. दिवसभर जे 4 ते 5 वेळा बांग दिली जाते, जी लाऊडस्पीकरवरून देतात. ती जर परत त्यांनी दिली, तर आमची लोकं हनुमान चालीसा त्या-त्या वेळी वाजवणार म्हणजे वाजवणार, अशा शब्दात राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन तुम्हाला करायचं असेल तर त्यांनी दिलेल्या डेसिबलचं पालन करावं लागेल. लोकवस्तीमध्ये 45 ते 55 डेसिबलपर्यंत स्पीकर लावू शकता. आम्हाला सणांसाठी दिवस बघून परवानगी देता आणि यांना 365 दिवस परवानगी देता ती कशासाठी? 45 ते 55 डेसिबल म्हणजे आमच्या घरचे मिक्सर जेवढे वाजतात तेवढा आवाज असं राज ठाकरे म्हणाले. ‘‘त्या मशिदीमधील मौलवींचे मी आभार मानेन’’ जवळपास 90-92 ठिकाणी महाराष्ट्रात सकाळची अजान झाली नाही, सर्व ठिकाणी आमची माणसं तयार होती. त्या मशिदीमधील मौलवींचे मी आभार मानेन. आमचा विषय आहे तो विषय त्यांना समजला. मुंबईचा जो रिपोर्ट आला, त्याप्रमाणे मुंबईत 1 हजार 140 मशिदी आहेत. त्यापैकी 135 मशिदींमध्ये सकाळची अजान 5 च्या आत वाजवली गेली, असं राज ठाकरे म्हणालेत. कोरेगाव-भीमा प्रकरण: तिसऱ्या समन्सनंतर आज शरद पवार नोंदवणार साक्ष काल मला विश्वास नांगरे पाटलांचा फोन आला, आम्ही सर्व मौलनींशी बोललो, सकाळची अजान लावणार नाही असं त्यांनी सांगितलं. आता ज्या 135 मशिदींनी अजान लावली त्यांच्यावर कारवाई होणार का? की आमच्याच पोरांना उचलणार? असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.