मुंबई, 12 जुलै: गेल्या काही महिन्यांपासून राज्यात MPSC च्या विद्यार्थ्यांच्या (MPSC students) नियुक्त्यांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्यात काही दिवसांपूर्वी पुण्यातील MPSC चा विद्यार्थी स्वप्नील लोणकर (Swapnil Lonkar death) यानं आत्महत्या केल्यानंतर यावर विद्यार्थी अधिकच आक्रमक झाले होते. मात्र आता राज्य शासनाकडून या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मोठा दिलासा मिळाला आहे. MPSC च्या रखडलेल्या नियुक्त्या (MPSC Appointments) लवकरच मार्गी लावण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. यासंबंधीची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती MPSC नं प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
SEBC प्रवर्गाचं आरक्षण वगळून शासनानं यासाठी नवीन नामावली जाहीर केली आहे. त्यानुसार लवकरच या रखडलेल्या नियुक्त्या जाहीर करण्यात येणार आहे. तसंच MPSC चं नवं वेळापञकही जाहिर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
2019 मध्ये घेण्यात आलेल्या MPSC चा परीक्षांचा निकाल लावण्यात आल्यानंतर मुलाखती झाल्या निवडही झाली मात्र निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अजूनही नियुक्ती देण्यात आली नव्हती. यावर विद्यार्थी नाराज होते. त्यात होतकरू विद्यार्थी स्वप्नील लोणकर यानं आत्महत्या केल्यानंतर हा मुद्दा चांगलाच तापला होता. त्यामुळे MPSC बोर्डानं अशा विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे.
हे वाचा - NEET Exam 2021: अखेर NEET परीक्षेचा मुहूर्त ठरला; 'या' तारखेला होणार परीक्षा
नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षानं MPSC चा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. यावर उत्तर देत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) 31 जुलैपर्यंत MPSC चा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आता राज्य शासनाकडून पावलं उचलण्यात आली असून MPSC बोर्डानं हा निर्णय जाहीर केला आहे.
MPSC च्या रखडलेल्या नियुक्त्या लवकर जाहीर करा यासाठी पुण्यात काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आलं होतं. तसंच काही विद्यार्थी निवड होऊनही नियुक्ती न झाल्यानं चिंतेत होते. अशा विद्यार्थ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. आता नियुक्त्या नक्की कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.