मुंबई, 31 मे: कालच UPSC चा निकाल जाहीर झाला यात देशभरातून अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण झालं. त्यात भर म्हणून आता राज्यसेवा मुख्य परीक्षा (MPSC) 2020 चा अंतिम निकाल व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगाने ट्वीट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. याआधी MPSC नं 29 एप्रिल रोजी गुणवत्ता यादी जाहीर जाहीर केली होती. त्यानंतर आता MPSC नं अंतिम निकाल जाहीर केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 4, 5 व 6 डिसेंबर, 2021 रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा-2020 चा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण 200 पदावर उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे अशी माहिती MPSC तर्फे देण्यात आली आहे. विशेष म्हणजे MPSC नं आजच या सर्व पदांसाठी मुलाखती घेतल्या होत्या आणि मुलाखतीनंतर काही वेळातच हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. MPSC तर्फे एकूण 652 पदांसाठीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. MPSC सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये रोहित कट्टे यानं राज्यभरातून प्रथम क्रमांक मिळवला आहे.
जाहिरात क्रमांक 60/2021 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 चा अंतिम निकाल/ शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/mLUdDGxTv0. https://t.co/CtYCgDOJA0. pic.twitter.com/UddPHWSIGj
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) May 31, 2022
MPSC च्या अंतिम निकालामध्ये प्रमोद चौगुले हे राज्यभरातून खुल्या प्रवर्गातून तर रुपाली माने या महिलांमधून प्रथम आले आहेत. गिरीश परेकर हे मागास्वर्गीयांमधून पहिले आले आहेत. प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत प्रस्तुत निकालाच्या आधारे शिफारस पात्र न ठरलेल्या उमेदवारांना उत्तरपुस्तिका/ उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसात आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.