'मूडीज'ने भारताचं रेटिंग वाढवताच शेअर बाजारात तेजी !

'मूडीज'ने भारताचं रेटिंग वाढवताच शेअर बाजारात तेजी !

मुडीजने भारताच्या अर्थविषयक रेटिंगमध्ये तब्बल 13 वर्षांनंतर सुधारणा झाली आहे. 'मूडीज्'ने 2004 साली भारताला बीएए 3 हे रेटिंग दिले होते, त्यानंतर आता ते वाढवून बीएए 2 करण्यात आले. या रेटिंग वाढवण्याचा तात्काळ फायदा म्हणजे भारताला आंतरराष्ट्रीय कर्जे घेणे सुसह्य होणार असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची पत ही सुधारणार आहे.

  • Share this:

17 नोव्हेंबर, नवी दिल्ली : एखाद्या देशाची अर्थव्यवस्था परकीय गुंतवणकीसाठी किती पोषक आहे. यासंबंधीचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं रेटिंग काढणाऱ्या 'मूडीज्' या अमेरिकन संस्थेनं भारताच्या रेटिंग्जमध्ये चक्क वाढ केलीय. 'मूडीज्' या संस्थेने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए3 वरुन बीएए2 असा बदल केला आहे. भारत सरकारने लागू केलेल्या जीएसटी, आधार संलग्नता आणि विविध लाभांचे पैसे थेट खात्यात जमा करणे अशी विविध महत्त्वाची पावले उचलण्यात आल्याने 'मूडीज्'ने हा निर्णय घेतला आहे. 'मूडीज्' ने भारताचं रेटिंग वाढवताच देशांतर्गंत शेअर बाजारातही उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय.

मुडीजने भारताच्या अर्थविषयक रेटिंगमध्ये तब्बल 13 वर्षांनंतर सुधारणा झाली आहे. 'मूडीज्'ने 2004 साली भारताला बीएए 3 हे रेटिंग दिले होते, त्यानंतर आता ते वाढवून बीएए 2 करण्यात आले. या रेटिंग वाढवण्याचा तात्काळ फायदा म्हणजे भारताला आंतरराष्ट्रीय कर्जे घेणे सुसह्य होणार असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची पत ही सुधारणार आहे.

"भारत सरकारने उचललेल्या पावलांमुळे अंतर्गत व परदेशी गुंतवणूक वाढेल, शाश्वत व भक्कम वाढीस प्राधान्य मिळेल, व्यवसायात चांगली स्थिती निर्माण होईल. वृद्धीची आणि विविध धक्के पचवण्याची क्षमता वाढवणे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मकता वाढण्यास या सुधारणांचा फायदा होईल" असे 'मूडीज्'ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

जीएसटी आणि नोटाबंदी निर्णयामुळे उद्योगावर परिणाम झाला, अशी सध्या केंद्र सरकारवर टीका होत आहे. विरोधकांनी सरकारला या मुद्यावर गेले वर्ष धारेवर धरले असताना 'मूडीज्'ने वाढवलेले रेटिंग सरकारला दिलासादायक ठरणार आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुजरात निवडणुकांमध्ये याचा उपयोग नरेंद्र मोदी यांचे सरकार निश्चितच या मुद्याचं उपयोग करुन घेईल, यात शंका नाही.

'मूडीज्' च्या रेटिंगनंतर शेअर बाजारात तेजी

‘मूडीज’नं भारताच्या रेटिंगमध्ये वाढ केल्यानंतर आज सकाळी शेअर बाजारातही उत्साहाची लहर पसरली. निर्देशकाने तब्बल 400 अंकाची उसळी घेतली आहे. आज शेअर बाजाराची सुरुवात 33,388 अंकांनी झाली आहे. निफ्टीमध्येही 100 अंकानी वाढ झाली आहे. निफ्टीची सुरुवात 10,327 अंकांनी झाली आहे.

शेअर बाजारासोबतच रुपया देखील मजबूत झाला आहे. 0.69 पैशांनी रुपया मजबूत झाला असून आज एका डॉलरची किंमत 64.63 रुपये आहे.

शेअर बाजार उघडताच सुरुवातीच्या तासाभरात टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, सिप्ला यांच्या शेअर्सनं चांगली कामगिरी केली. तर विप्रो, टीसीएस, इन्फोसिस यासारख्या आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्समधील या बदलामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

First published: November 17, 2017, 12:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading