मुंबई, 30 ऑगस्ट: ‘माझ्या हातात लक्षमी टिकत नाही’ अशी तक्रार अनेकांची असते. भारतीय संस्कृतीत लक्षमी म्हणजेच पैसे. एका हातानं पैसे कमवायचे आणि दुसऱ्या हातानं खर्च करायचे अशी सवय अनेकांना असते. महिन्याचा पगार येण्याच्या आधीच आपली खर्चाची यादी तयार असते. बरेचदा अनावश्यक खर्च (Unnecessary expenses) करण्याची काही जणांना सवय असते. जी वस्तू आपल्या काहीच कामाची नाही अशा वस्तू खरेदी करण्यामध्ये अनेकजण पैसे खर्च करतात. तर बहुतांश वेळी बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यात पैसे खर्च करतात. मात्र आजकालच्या काळात पैशांची बचत (Best Way to Save Money) करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Tips to Save money) देणार आहोत ज्यांच्या वापर करून तुम्ही पैशांची बचत करू शकता. पिग्गी बँक ठेवा आजकालच्या काळात पैशांची वाचत करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे पिगी बँक (Piggy bank) ठेवणे. आपण स्वतःची पिग्गी बँक ठेवली पाहिजे. आपण त्यात दररोज काही पैसे ठेवले पाहिजेत. जेव्हा तुम्हाला पैशांची सर्वात जास्त गरज असते तेव्हा हा फंड नक्कीच उपयोगी पडेल. तसंच दाररोज या पिग्गी बँकमध्ये काहींना काही पैसे ठेवण्याची सवय लावली पाहिजे. अनावश्यक खरेदी नको बरेचदा महिलांना एकाच पॅटर्नचे आणि एकाच रंगाचे कपडे पुन्हा पुन्हा कळरेदी कार्य खूप आवडतं किंवा एक वस्तू घरी असताना दुसरी तशीच वस्तू खरेदी करायला आवडतं. मात्र असं करू नका. शक्य झाल्यास अनावश्यक खरेदी टाळा. यामुळे तुमचा वेळ आणि तुमच्या पैशांची बचत होईल. ऑफर्स असतानाच शॉपिंग करा अनेकदा ऑनलाईन शॉपिंग करताना ऑफर्स सुरु असतात. काही सणांच्या निमित्तानं कंपन्या प्रोडक्ट्सवर ऑफर लाँच करतात. त्यामुळे ही संधी सोडू नका. अशा ऑफर्समध्ये खरेदी करा. ज्यामुळे तुमच्या पैशांची बचत होईल. हे वाचा - घरबसल्या भरघोस पैसे कमवण्याची मोठी संधी; करा ‘हे’ भन्नाट ऑनलाईन पार्ट टाइम जॉब्स जंक फूड टाळा बरेचदा लोकं महागड्या हॉटेलमध्ये जाऊन जेवणं पसंत करतात. अर्थात त्यात काहीच वाईट नाही. मात्र नेहमीच हॉटेलात जाऊन जेवलं किंवा जंक फूडचं प्रमाण जास्त होत असेल तर तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागते. म्हणूनच शक्य झाल्यास घरीच जेवण करा आणि बाहेरचे महागडे आरोग्यास घटक असणारे खाद्यपदार्थ खाऊ नका. कंजूष बानू नका अनेकदा लोक बचत करण्याच्या नादात महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करत नाहीत. लक्षात ठेवा कंजूषपणा आणि बचत करण्यात फरक आहे. बचत करण्याच्या नादात कोणाचं मन दुखावणार नाही ना याची काळजी घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







