मुंबई, 04 एप्रिल : कोरोनाने सध्या संपूर्ण देशामध्ये थैमान घातलं आहे. अशात या विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या काळात पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार स्वत:च्या जीवाची परवा न करता आपल्यासाठी काम करत आहेत. खरंतर या सर्वांना देवदूतच म्हणावं लागेल. याचाच एक अतिशय मनाला भावेल असा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ मनसे अधिकृवरून फेसबूकवर शेअर करण्यात आला आहे. मनसेनं एका सात महिन्याच्या बाळाचा व्हिडिओ फेसबूकवर शेअर केला आहे. त्याला कोरोना झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे एका नर्स या बाळाशी खेळत आहे. त्याला हसवण्याचा प्रयत्न करत आहे. हे बाळही नर्ससोबत हसत खेळत आहे. आपल्या जीवाची परवा न करता एखाद्याच्या सुखासाठी अशा प्रकारे झटणारे देवदूतच आहेत. त्यांच्या या कार्याला खऱ्या अर्थाने सलाम करायला हवं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यांत पाणी येईन.
‘निशब्द करणारा क्षण! कोरोनाग्रस्त मुलाला खेळवताना एक नर्स. मुंबईमध्ये ०७ महीन्याच्या कोरोना पॉझिटिव्ह मुलाला हसवताना एक परिचारिका (नर्स), सलाम आहे कोरोनाच्या संकटात स्वतःला झोकून देऊन लोकांची सेवा करणाऱ्या या सर्वांना.’ असं हा व्हिडिओ शेअर करताना मनसेकडून लिहण्यात आलं आहे.

)








