मुंबई, 13 जानेवारी : जगातील आघाडीच्या मुंबई विद्यापीठाच्या मास्टर प्लानला मुहूर्त सापडलेला नाही. या प्रकरणात एमएमआरडीएकडून चालढकल होत असल्याचा दावा आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला. माहितीच्या अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नातून हे सत्य समोर आल्याचं त्यांनी सांगितलं.
काय आहे प्रकरण?
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीएकडे मुंबई विद्यापीठाच्या मास्टर प्लानची माहिती मागितली होती. एमएमआरडीएचे जन माहिती अधिकारी अंकित दास यांनी अनिल गलगली यांस कळविले की सदर मास्टर प्लान बनविण्याची प्रक्रिया प्रगती पथावर आहे. सदर मास्टर प्लान बनविण्यासाठी नेमलेल्या सल्लागारास आतापर्यंत रु. 4,96,000 इतकी रक्कम त्याने सादर केलेल्या देयकानुसार अदा करण्यात आली आहे.
15 महिन्याच्या मुलीला झाला होता दुर्मीळ आजार, कोमात गेल्यानंतरही वाचला जीव
मुंबई विद्यापीठाचा मास्टर प्लान तयार करण्यासाठी एमएमआरडीएने 28 ऑगस्ट 2019 रोजी दिल्ली येथील मेसर्स डीडीएफ कन्सलेंट यास काम दिले असून एकूण रु 1.12 कोटीचे कंत्राट आहे. मागील 40 महिन्यापासून मास्टर प्लान तयार होत आहे.
मुंबई विद्यापीठाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने एमएमआरडीएने पुढाकार घेतला आहे.
एमएमआरडीएकडून या प्रकरणात चालढकल होत असल्याची खंत व्यक्त गलगली यांनी व्यक्त केली आहे. हा मास्टर प्लान कधी होई याची अजूनही एमएमआरडीएला खात्री नाही. या प्रकल्पाशी संबंधित सल्लागारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.