जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / अल्पवयीन मुलाला कोंबडा बनवून 30 फूट पर्यंत चालवले, मित्रालाही मारहाण, संतापजनक घटना

अल्पवयीन मुलाला कोंबडा बनवून 30 फूट पर्यंत चालवले, मित्रालाही मारहाण, संतापजनक घटना

सीसीटीव्हीतील दृश्य

सीसीटीव्हीतील दृश्य

यादरम्यान, एक आरोपी संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवत होता. त्यांचे कपडे काढून त्यांना मारहाण करण्यात आली, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.

  • -MIN READ Local18 Madhya Pradesh
  • Last Updated :

अरविंद शर्मा, प्रतिनिधी भिंड, 18 जुलै : मध्यप्रदेश राज्यातून मानवतेला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल माडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका अल्पवयीन मुलाला कोंबडा बनवून चालायला लावल्याचे दिसत आहे. तसेच यामध्ये तीन अल्पवयीन हे दोन अल्पवयीन मुलांचे कपडे उतरवून त्यांना बेल्ट आणि काठीने मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ भिंड जिल्ह्याच्या मौ नगर येथील आहे. तसेच हा व्हिडिओ 8 ते 10 दिवस जुना असल्याचे सांगितले जात आहे. आरोपींमधून एकाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. तसेच एसडीपीओ सौरभ कुमार यांनी सांगितले की, पीडित मुले हे मौ नगरमध्ये शिक्षण घेत आहेत. मारहाण करणाराही येथीलच रहिवासी आहे. पीडित मुलांनी पोलिसांना सांगितले की, त्यांना कोंबडा बनवून मारहाण करण्यात आली. तसेच 30 फूट पर्यंत दोघांना कोंबडा बनवून चालायला सांगितले. तसेच यावेळी बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है, हे गाणं ते वाजवत राहिले. तसेच आम्हालाही गायला लावले.

News18लोकमत
News18लोकमत

यादरम्यान, एक आरोपी संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवत होता. त्यांचे कपडे काढून त्यांना मारहाण करण्यात आली, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. असे सांगितले जात आहे की, ज्या अल्पवयीन मुलांना मारहाण करण्यात आली, त्यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये एक आरोपीच्या आईवर अश्लिल टिप्पणी केली होती. यानंतर आरोपीने आपल्या मित्रांच्या मदतीने दोघांना पकडले आणि त्यांना मारहाण केली. व्हिडिओमध्ये जेव्हा ही मुले ओरडायला लागली तेव्हा एक आरोपी व्हिडिओमध्ये बोलला की, जेव्हा याच्याविरोधात बोलला होता, तेव्हा विचार केला नसेल की असेल काही होईल. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल प्रकरणी मौ. ठाण्याचे प्रभारी उदयभान यादव यांनी सांगितले की, एका आरोपीला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मारहाण करणारी मुलेही अल्पवयीन आहेत. यापैकी एका काही दिवसांपूर्वी अवैध शस्त्रांसोबत अटक करण्यात आली होती. तेव्हा त्याला पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात