रांची, 5 मार्च : झारखंडमधील (Jharkhand News) पाकुड शहरातील आंबेडकर चौकाजवळ बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) शाळेत पैसे जमा करण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाने थेट पैसे गायब केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, छोटी अलीगंज येथे राहणारा सोनू कुमार आपल्या फार्ममधील 78,600 रुपये जमा करण्यासाठी बँकेत गेला होता. तो पैसे जमा करण्यासाठी रांगेत होता. बँकेतच्या शाखेत पैसे जमा करण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाचे पैसे गायब झाले होते. यानंतर तातडीने याबाबत पोलिसांना कळवण्यात आलं. सांगितलं जात आहे की, बँकेत एका व्यक्तीने अतिशय शिताफिने 78 हजार रुपये चोरले होते आणि पैसे घेऊन ती व्यक्ती पसार झाली होती. हे ही वाचा- काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नात पोटभर जेवले अन् तब्बल 1200 पाहुणे रुग्णालयात पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, ते बँकेत चिठ्ठी भरून कॅशिअरला पैसे द्यायला जात होते, त्याच वेळी त्यांच्या हातात पैसे नसल्याचं लक्षात आलं. यानंतर संपूर्ण बँकेत गोंधळ उडाला. पीडित व्यक्तीने तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी पीडित व्यक्तीकडून जबाब नोंदवून घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.