पुणे, 26 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात (Maharashtra Human Painting) वेगळेच वातावरण होते. पुण्यातील तब्बल 4 हजार विद्यार्थ्यांनी 4 लाइव्ह ह्यूमन पेंटिग्स तयार केल्या आहेत. या पेंटिग्सची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Records) नोंद करण्यात आली आहे. जील एज्युकेशन सोसायटीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी महाराष्ट्रातील चार महत्त्वाच्या व्यक्तींचे पेंटिग्स तयार केले होते. यामध्ये पुण्यातील तब्बल 4 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
Maharashtra: More than 4000 students gathered to create large portraits of the national flag, Chhatrapati Shivaji Maharaj, Rajmata Jijau, & Tanaji Malusare in Pune yesterday. pic.twitter.com/jBNbdFuRw6
— ANI (@ANI) January 26, 2020
या कार्यक्रमाअंतर्गत पुण्यातील तब्बल 4 हजार विद्यार्थ्यांनी कार्ड बोर्डच्या मदतीने राष्ट्रीय ध्वज, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि तानाजी मालुसरे यांच्या पेंटिग्स तयार केल्या आहेत. साधारण २५ हजार फूट क्षेत्रफळात या पेंटिग्स तयार करण्यात आल्या आहेत. पोट्रेट तयार करण्यासाठी विद्यार्थी 52 कॉलम आणि 78 रांगांमध्ये उभे होते. हा कार्यक्रम रेकॉर्ड करण्यासाठी लंडनमधून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची टीम पुण्यात आली होती. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कामांचे निरीक्षण केले. या सर्व पेंटिग्स अतिशय सुदंर व काहीही चूक न होता तयार झाल्या. या विद्यार्थ्यांनी सर्वात मोठा ह्यूमन लाइव पोट्रेट तयार केला असून यासाठी त्यांचे नाव रेकॉर्ड बूकमध्ये नमूद करण्यात आले आहे. गेल्या एक आठवड्य़ापासून हे विद्यार्थी ह्यूमन पेंटिग्स बनविण्याची तयारी करत होते. अहोरात्र मेहनत करुन अखेर विद्यार्थी त्यांच्या कामात यशस्वी झाले आहेत. ड्रोनच्या मदतीने विद्यार्थ्यांनी काढलेले छायाचित्र कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. जील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक एस.एम.कटकर यांनी यासंदर्भात सांगितले की, भारताची संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा जगभरात खास आहेत. आम्ही या पेंटिग्सच्या माध्यमातून आपला वारसा पुन्हा जीवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील अनेक समाजसेवी संस्था आणि नेत्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.