Home /News /news /

काँग्रेसच्या ठाकरेंना शिवसेनेचा 'पंच', भावना गवळींचा दणदणीत विजय

काँग्रेसच्या ठाकरेंना शिवसेनेचा 'पंच', भावना गवळींचा दणदणीत विजय

लोकसभा निवडणूक 2019चे निकाल अखेर हाती आले आहेत. या निवडणुकीच्या निकालाची देशासहीत परेदशातही उत्सुकता होती.

    यवतमाळ, 23 मे : लोकसभा निवडणूक 2019चे निकाल अखेर हाती आले आहेत. या निवडणुकीच्या निकालाची देशासहीत परेदशातही उत्सुकता होती. देशातल्या जनतेनं NDAच्या उमेदवारांना आपला कौल दिला आहे. या निकालावरून महाराष्ट्रातही भाजपचं काँग्रेसमुक्त महाराष्ट्राचं स्वप्नदेखील सत्यात उतरल्याचं दिसलं. विदर्भातही जनतेनं युतीच्या पारड्यात आपलं मत टाकलं आहे. यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेच्या भावना गवळी यांनी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांना आपला 'पंच' देऊन दणदणीत विजय मिळवला आहे. भावना गवळी यांनी पाचव्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली आहे. या मतदारसंघातील आधीचा इतिहास पाहता शिवसेनेने यंदाच्या निवडणुकीतही विद्यमान खासदार भावना गवळी यांनाच मैदानात उतरवण्याचं ठरवलं. त्यांच्याविरोधात काँग्रेसनंही माणिकराव ठाकरेंसारखा तगडा उमेदवार रिंगणात उतरवला. म्हणून काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. गवळींच्या करिश्म्यासमोर काँग्रेसच्या ठाकरेंचं आव्हान फिके पडल्याचं दिसत आहे. भावना गवळींनी आपला गड कायम राखत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, मंत्री, उपसभापतीपदाची जबाबदारी पार पाडणाऱ्या माणिकराव ठाकरे यांचा दणदणीत पराभव केला आहे. वाचा :BREAKING LIVE Lok Sabha Election Result 2019: राहुल गांधी अमेठीतून पराभूत भावना गवळींचा 'पंच' 1999 : तेरावी लोकसभा निवडणूक, विजयी उमेदवार (पहिली टर्म) 2004 : चौदावी लोकसभा निवडणूक, विजयी उमेदवार(दुसरी टर्म) 2009 : पंधरावी लोकसभा निवडणूक, विजयी उमेदवार (तिसरी टर्म) 2014 : सोळावी लोकसभा निवडणूक, विजयी उमेदवार (चौथी टर्म) 2019 : सोळावी लोकसभा निवडणूक, विजयी उमेदवार (पाचवी टर्म) वाचा :LIVE Lok Sabha Election Result 2019: भारताच्या उज्ज्वल भविष्याची गॅरेंटी - नरेंद्र मोदी याआधी चार वेळा खासदार भावना गवळी या शिवसेनेच्या मोठ्या नेत्या आहेत आणि त्या चार वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. 2014 च्या निवडणुकीत भावना गवळी यांना 4 लाख 77 हजार 905 मतं मिळाली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या शिवाजीराव मोघेंचा पराभव केला होता. या मतदारसंघात यवतमाळच्या चार आणि वाशिमच्या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातले यवतमाळ, पुसद, दिग्रस, राळेगाव आणि वाशिम जिल्ह्यातल्या वाशिम आणि कारंजा हे विधानसभा मतदारसंघ येतात. फेररचनेच्या आधी हा फक्त वाशिम मतदारसंघच होता. नंतर त्यात यवतमाळही जोडण्यात आला. 'भावनां'ना युतीतल्या आमदारांचा होता विरोध भावना गवळी यांनी या निवडणुकीतही आपला गड कायम राखला असला तरी लोकसभा निवडणूक 2019चं तिकीट त्यांना मिळू नये यासाठी शिवसेना आणि भाजपचे खासदार एकवटले होते. यासाठी शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गळही घातल्याची माहिती समोर आली होती. राठोड यांना भाजपच्या आमदारांनी पाठिंबाही दर्शवला होता. भाजप आमदार आणि राज्यमंत्री मदन येरावार, आमदार राजेंद्र पाटणी आणि संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे भावना गवळी नको, असं साकडं घातलं होतं. लोकसभा निवडणूक 2014चा निकाल भावना गवळी, शिवसेना : 4,77,905 मतं अॅड. शिवाजीराव मोघे, काँग्रेस : 3,84,089 मतं भावना गवळी यांचा 93,816 मतांनी विजय वाचा :नेहरु, इंदिरा गांधींना जमले नाही, मोदींनी केला हा विक्रम! नवख्या उमेदवारामुळे लढत ठरली लक्षवेधी विदर्भातील यवतमाळ-वाशिम मतदारसंघाची निवडणूक राज्यभरात लक्षवेधी ठरली ती समोरासमोर उभ्या ठाकलेल्या दिग्गजांमुळे नव्हे, तर पहिल्यांदाच निवडणुकीला उभ्या राहिलेल्या एका नवख्या उमेदवारामुळे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. युती आणि आघाडीनं आपलं तगडे उमदेवार रिंगणात उतरवले होतेच, पण राज्यात वैशाली येडे या तिसऱ्या उमेदवाराचीच चर्चा अधिक होती. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार या पक्षाकडून त्यांना तिकीट देण्यात आलं होतं. वैशाली येडे हे नाव पहिल्यांदा चर्चेत आलं होतं यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी. नयनतारा सेहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यामुळे मोठा वाद ओढवला होता. आयत्या वेळी वैशाली येडे यांना संमेलनात भाषण करण्याची संधी मिळाली. शेतकरी पतीने आत्महत्या केल्यानंतर काय-काय प्रश्नांना सामोरं जावं लागतं? यापासून ते हा प्रश्न वैयक्तिक नसून सामाजिक प्रश्न कसा आहे? यापर्यंत त्यांनी विवेचन केलं आणि त्यांचं भाषण गाजलं. शेतकऱ्याच्या पत्नीचं मनोगत अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारं ठरलं. तेव्हापासून वैशाली यांचं नाव महाराष्ट्रात गाजत आहे. वैशाली यांचं नाव आणि त्यांची 'व्होट आणि नोट दोन्ही द्या' ही मोहीम ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये जास्त गाजली. सोशल मीडियावर वैशाली येडे यांनी ही मोहीम सुरू केली होती. निवडणूक लढवण्यासाठी पैसा नाही. हा निधी त्यांनी क्राउड फंडिंगच्या माध्यमातून गोळा केला. वैशाली येडे हे नाव या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये वेगळं म्हणून पुढे आलं. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी म्हणून वैशाली येडे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी लढा उभारला. VIDEO : जनादेशानं घराणेशाही नष्ट केली, अमित शहांचं UNCUT भाषण
    First published:

    Tags: Yavatmal Washim S13p14

    पुढील बातम्या