एक रात्रीत नशीब बदलल्याचं किंवा चमकल्याचं फक्त सिनेमात घडत असल्याचं आतापर्यंत आपण पाहात होतो मात्र अशी खरी घटना समोर आली आहे.
मजुराचं नशीब उजळवणारा एक अजब प्रसंग घडला. हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मध्य प्रदेशात पन्ना इथली ही घटना आहे.
35 वर्षीय मजुराला खोदकाम करताना त्याच्या पायाला अचानक ठेच लागली. त्यानं पायात काय आलं पाहायला गेला आणि त्याचं नशीबच चमकल्यासारखं झालं. या मजुराला साधारण 10.69 कॅरेट वजनाचा हिरा मिळाला.
या हिऱ्याची साधारण किंमत सध्या बाजाराच्या किमतीचा विचार करता 50 लाख ते 1 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
आनंदीलाल कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार याआधी खाणीच्या उत्खननात मला 70 सेंट किंमतीचा हिरा मिळाला होता आणि आता मला 10.69 कॅरेटचा मौल्यवान हिरा मिळाला आहे. ज्यांना हिरा माहित आहे त्यांच्या म्हणण्यानुसार उत्खननादरम्यान मजुराला मिळालेल्या या हिऱ्याची किंमत 50 लाख ते एक कोटी रुपये आहे.
या आधी मागच्या वर्षी पन्न इथे बृजेश उपाध्याय नावाच्या व्यक्तीला खोदकामादरम्यान 29.46 कॅरेट वजनाचा हिरा सापडला होता.