जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / धक्कादायक! शाळा बुडवून तीन मैत्रिणींनी प्यायलं विष, दोघींचा मृत्यू

धक्कादायक! शाळा बुडवून तीन मैत्रिणींनी प्यायलं विष, दोघींचा मृत्यू

धक्कादायक! शाळा बुडवून तीन मैत्रिणींनी प्यायलं विष, दोघींचा मृत्यू

इंदूरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण प्रशासन हादरलं आहे. ही घटना भवर कुआँ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनानं पोलिसांना माहिती दिली.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळा बुडवून आष्टा शहरातून इंदूरला आलेल्या तीन अल्पवयीन मुलींनी एकत्र विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय. शुक्रवारी (28 ऑक्टोबर 2022) ही घटना घडली असून, यात दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला आहे. तर, एका मुलीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. ही घटना भवर कुआँ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनानं पोलिसांना माहिती दिली. ‘टीव्ही 9 हिंदी’ने याबाबत वृत्त दिलंय. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी या तीन अल्पवयीन मुली शाळा बुडवून इंदूरला रवाना झाल्या होत्या. इथेच त्यांनी एकत्र विष प्राशन केलं. याबाबत इंदूरचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त प्रशांत चौबे यांनी सांगितलं की, ‘विषप्राशन केलेल्या तीन पैकी दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला, तर एकीवर उपचार सुरू आहेत. या तिघी सिहोर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तिघींपैकी एका मुलीनं कौटुंबिक वादातून विषप्राशन केलं, तर दुसऱ्या मुलीने मैत्रीसाठी विष प्राशन केलं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘मुलींनी आष्टा येथे विष विकत घेतलं, आणि इंदूरमध्ये ते त्यांनी प्राशन करून आत्महत्या केली. सध्या या तिन्ही मुलींचे कुटुंबीय इंदूरला पोहोचले असून, या घटनेचा त्यांना मोठा धक्का बसलाय. यासर्वांचे जबाबही नोंदवले जातील. घटनास्थळी किंवा या मुलींकडे कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.’ हेही वाचा - Mobile Shop Fire : मुंबईतील मोबाईल शॉप आगीच्या विळख्यात, 4-5 दुकानं खाक; दुर्घटनेचा VIDEO आत्महत्येचं कारण धक्कादायक पोलिसांनी माहिती दिली की, ‘या घटनेनंतर तिघींनाही उपचारांसाठी एम. वाय. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे शुक्रवारी सायंकाळी उशिरा दोघींचा मृत्यू झाला. तिसऱ्या अल्पवयीन मुलीवर उपचार सुरू आहेत.’ दरम्यान, मुलींनी विषप्राशन केल्याची माहिती पोलिसांना हॉस्पिटलमधून मिळाली होती. यानंतर पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये पोहोचून विषप्राशन करण्याच्या कारणाचा शोध घेतला असता धक्कादायक कारण समोर आलं आहे. ‘एका मुलीनं कौटुंबिक वादातून विषप्राशन केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. तर दुसऱ्या मुलीनं मैत्रीच्या कारणावरून विष घेतलं आहे. मात्र, तिसऱ्या मुलीनं विष का प्राशन केलं, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही,’ असे पोलिसांकडून सांगण्यात आलं. दरम्यान, या तिघींनी रिजनल पार्कमध्ये विषप्राशन केल्याचं वृत्त आलं होतं. मात्र उद्यानात अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं येथील कर्मचाऱ्यांनी सांगितलं. तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटनेच्या वेळी तिघीही रिजनल पार्क रोडवर फिरत होत्या. दुसरीकडे, इंदूरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण प्रशासन हादरलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात