06 ऑगस्ट : सण उत्सवांचा महिना सुरू झाला की आपल्या सगळ्यांना वेध लागतात ते गणपती आणि नवरात्रीचे. मंडळी आता नवरात्रीची ही उत्सुकता आणखी ताणली जाणार आहे कारण आपल्या सगळ्यांसाठी सलमान खान प्रोडक्शन 'लवरात्री' हा सिनेमा भेटीला येणार आहे. सलमान खानचा भाऊजी आयुष शर्माचा हा पहिला-वहिला सिनेमा नवरात्री उत्सवाला आपल्या सगळ्यांच्या भेटीला आला आहे.
या सिनेमातून आयुष शर्मा आणि वारिना हुसेन सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत. या सिनेमाचं पहिलं लूक आणि प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. काही मिनिटाआधीच हा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अभिनेता सलमान खान यानेही या सिनेमाच्या ट्रेलर रिलीज झाल्याचं चाहत्यांना सांगत ट्विट केलं आहे.
Loveratri - Yeh kahaani hai pyaar aur mohabbat ki! Aapke liye... https://t.co/KNhMMgHFWD#LoveratriTrailer #LoveTakesOver @aaysharma @warina_hussain @abhiraj21288 @skfilmsofficial @tseries
Loading...— Salman Khan (@BeingSalmanKhan) August 6, 2018
पहा या सिनेमाची एक खास झलक...
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा