Home /News /news /

जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी लहान मुलांना कशी द्याल; पालकांनी घ्यावी कुठली काळजी

जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी लहान मुलांना कशी द्याल; पालकांनी घ्यावी कुठली काळजी

‘फॅमिली प्रोसेस’ (Family Process) जर्नलमध्ये मार्क फेनबर्ग यांनी एका लेखाद्वारे मुलांचे मनस्वास्थ कसे टिकवावे याबाबत मार्गदर्शन केलं आहे. यासाठी सकारात्मक पालकांचे सकारात्मक नातेसंबंध महत्त्वाची भूमिका बजावतात असं त्यांनी म्हटलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई 24 मे: कोविड-19च्या साथीनं (Covid-19 Pandemic) सगळ्या जगभरात थैमान घातलं आहे. या साथीच्या दुसऱ्या लाटेनं तर अनेकांचा बळी घेतला आहे. कितीतरी कुटुंब यात उद्ध्वस्त झाली आहेत. संपूर्ण कुटुंबच या रोगाला बळी पडले आहे किंवा एखाद्या कुटुंबात आई-वडील दोघांचाही मृत्यू झाला आहे आणि त्यांची लहान मुलं मागे उरली आहेत, अशाही अनेक घटना घडल्या आहेत. आर्थिक सुरक्षितता (Financial Insecurity), नोकरी गमवणे (Job lost), कुटुंबातील अगदी प्रिय व्यक्ती, जवळचे मित्र, मैत्रीणी गमावणे अशा अनेक प्रकारचा फटका लोकांना बसला आहे. या सगळ्या परिस्थितीचा मुलांच्या (Child) मनावरही (Mental) विपरीत परिणाम होत आहे. त्यांचं मानसिक स्वास्थ (Mental Health) टिकवून ठेवण्यासाठी पालकांनी एकमेकांना आणि मुलांना पाठबळ देणं गरजेचं आहे. याबाबत पेनसिलव्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या (Pennsylvania State University) ‘फॅमिली प्रोसेस’ (Family Process) जर्नलमध्ये मार्क फेनबर्ग यांनी एका लेखाद्वारे मुलांचे मनस्वास्थ कसे टिकवावे याबाबत मार्गदर्शन केलं आहे. यासाठी सकारात्मक पालकांचे सकारात्मक नातेसंबंध महत्त्वाची भूमिका बजावतात असं त्यांनी म्हटलं आहे. या कठीण परिस्थितीत पालक एकमेकांना साथ देऊ शकतात तर ते मुलांना आधार देण्यास सक्षम असतील. आर्च मॉडेल (ARCH Model) : मुलांचं मानसिक स्वास्थ जपण्यासाठी न्यू होरायझन्स चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरमधील तज्ज्ञांनी मानसिक आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, पालक आणि शिक्षकांसाठी ‘एआरसीएच’अर्थात आर्च मॉडेल (ARCH Model) मांडले आहे. आर्च मॉडेल हे स्वीकार, प्रयत्न, लवचिकता, सहकार्य , काळजी तसंच विनोद आणि नम्रता यांचे संक्षिप्त रूप आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या अस्थिर, अनिश्चित परिस्थितीत मुलांना परिचित सुरक्षित झोनऐवजी सध्याच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास आणि त्यासाठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहन दिले जाऊ शकते. शारिरीक क्रियाकलापांचे पर्याय मोठ्या प्रमाणात कमी केले आहेत. मुलं आपला जास्त मोकळा वेळ टेलिव्हिजन किंवा मोबाइल फोनवर घालवितात. त्यांना सकारात्मकरित्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचे कौशल्ये शिकवणे आवश्यक आहे. मुलांना त्यांचा वर्तमानकाळ, भविष्यकाळ सुरक्षित आणि सकारात्मक वाटणं आवश्यक आहे. याकरता सध्याच्या कठीण काळात लोक कसे एकत्र येऊन संकटावर मात करत आहेत, याची माहिती देणं आवश्यक आहे. सध्या निर्माण झालेली स्थिती हे एक अभूतपूर्व आव्हान आहे. त्यामुळे त्यात अपयश येण्याची शक्यताही असू शकते, हे लक्षात घेऊन त्यादृष्टीनं मानसिक तयारी ठेवणं आवश्यक आहे. त्याकरता मुलं काय संगत आहेत ते ऐकण्यासाठी पालकांनी तयारी दाखवणे. मुलांना त्यांच्या चिंता व्यक्त करण्याची संधी देणं आणि त्यांच्या उपक्रमांमध्ये पालकांनी भाग घेणं हे त्यादृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल आहे. वस्तुस्थिती काय आहे याची स्पष्ट कल्पना मुलांना द्यावी. त्यांच्यासमोर विनाकारण परिस्थितीचे गुलाबी चित्र रंगवू नये. मुलांच्या प्रश्नांची उत्तरं योग्य रितीनं साध्या सोप्या पण ठोस स्पष्टीकरणांसह देणं आवश्यक आहे. आव्हानांना ठामपणे तोंड देण्यास सक्षम असल्याचं आणि त्यासाठी सज्ज असल्याचा विश्वास निर्माण केल्यास मुलं येईल त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम होतील. या दीर्घकाळच्या संकटात सहयोग (Collaboration) आणि काळजी (Care) हे महत्त्वाचे घटक आहेत. मुलांना रोज बदलत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नवनवीन संकल्पना सुचवण्यासाठी पालक, भावंड, मित्र, शिक्षक आणि इतर जवळचे लोक यांच्याकडे जाण्यासाठी प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. मोठ्यांच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली आव्हानांवर सर्जनशील तोडगा काढण्यासाठी एकमेकांच्या सहकार्यानं एकत्रितपणे काम करणं महत्त्वाचं असतं हे त्यांना समजणे आवश्यक आहे. रोजच्या आयुष्यातील ताण दूर होण्यासाठी घरात खेळीमेळीचं, हलकफुलकं वातावरण ठेवणं जितकं आवश्यक आहे तितकंच मुलांना शांतपणे परिस्थिती स्वीकारण्यासाठी आणि संतुलित पद्धतीनं वागण्यासाठी मदत करणं आवश्यक आहे. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी : सध्याच्या काळात विशेष गरजा (Special Child) असलेल्या मुलांची तर अधिक काळजी घेणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी त्यांची धैर्याची आवश्यकता आहे. त्यांच्या दैनंदिन जीवनात येणारे साधे अडथळेदेखील त्यांच्या मानसिक स्वस्थावर मोठा परिणाम करतात. त्यामुळं त्यांची आंघोळ, दात घासणे यासह खेळ, मनोरंजन आदी गोष्टी व्यवस्थित पार पडतील याचं नियोजन करणं आवश्यक आहे. त्यामुळे पालकांनाही स्वतःचं कामकाज व्यवस्थित पार पाडणं शक्य होईल. मुलास घरगुती कामात सहभागी करून घेणंही अत्यंत फायदेशीर आहे. ही एक प्रकारची थेरपीच आहे. जवळच्या लोकांनी केलेलं कौतुक आणि घरामध्ये योगदान देण्याची क्षमता मुलांना शिकण्यासाठी बळ देते. तुमच्या मुलाच्या विकासासाठी बालरोगतज्ञ आणि या क्षेत्रातील कार्यकर्ते दूरध्वनीच्या माध्यमातूनही तुम्हाला सल्ला देऊ शकतात. त्यासाठी निश्चित असे उपक्रमही तयार करण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या सल्ल्यानं औषधोपचारही सुरू ठेवता येतात. मुलांना दररोज थोड्या वेळासाठी सोशल मीडियावर कुटुंबातील इतर सदस्य आणि मित्रांशी संपर्क साधण्यासाठी मदत करा. वाढदिवसासारखे कौटुंबिक कार्यक्रम व्हिडिओ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून साजरे केले जाऊ शकतात. मुलांना कोणतेही निर्बंध, देखरेख न ठेवता स्क्रीनवर वेळ घालवू देऊ नका. वाईट बातमी कशी सांगाल : कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये, दुर्दैवाने, बर्‍याच मुलांना आपले दोन्ही किंवा एक पालक गामावण्याची वेळ आली आहे. या मुलांना ही बातमी कशी सांगायची हा नेहमीच मोठा प्रश्न इतरांसमोर उभा असतो. तेव्हा अशी बातमी शक्य तितक्या हळुवारपणे सांगण्याचा सल्ला मी देईन. मुलाच्या इच्छेनुसार त्यांना शेवटच्या संस्कारात भाग घेण्याची परवानगी द्या. मुलाच्या वागणुकीबद्दल किंवा भावनांबद्दल आधीच मत बनवू नका. मुलाला त्यांच्या पद्धतीने दुःख व्यक्त करू द्या. काही मुलं पटकन मनातलं सांगतात, मोकळी होतात, तर काहीजण अंतर्मुख असतात. मुलांप्रती आपुलकी, पाठबळ दाखवणं महत्त्वाचं आहे. अशावेळी मुलांना खूप भीती वाटू शकते, असुरक्षित किंवा दोषी वाटू शकते, काळजी वाटू शकते. त्यांना नेमके काय वाटते आहे ते ओळखा. आपलं प्रेम आणि पाठबळ त्यांना जाणवू द्या. आपल्या शब्दांद्वारे आणि कृतींनी त्यांना आधार द्या. त्यांचे आई-वडील मरण पावलेले आहेत हे स्पष्ट सांगा. ते गावाला गेले आहेत, लवकरच परत येतील असं सांगून त्यांची फसवणूक करू नका. ज्या मुलांना कोणीच इतर आधार नाही अशा मुलांसाठी 1098 डायल करा आणि मदत मिळवा. तुम्हाला स्वतःला तणावग्रस्त किंवा अत्यंत दु: खी वाटत असल्यास तर कोणतीही लाज न बाळगता आधार घ्या. आनंदी आणि मानसिक दृष्ट्या सक्षम मुलांसाठी निरोगी आणि मानसिक दृष्ट्या खंबीर पालक असणं अत्यंत आवश्यक आहे. या सोप्या टिप्स उपयोगी ठरत नसल्यास किंवा तुम्हाला आत्मविश्वास वाटत नसल्यास बालरोगतज्ञ, बाल मानसशास्त्रज्ञ किंवा समुपदेशकांचा सल्ला घ्या. चुकीची कृती करून नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा आधीच सुरक्षितेसाठी काळजी घेतलेलं केव्हाही चांगले असते. सर्व वाईट गोष्टींचा अंत होतो तसा या साथीचाही शेवट होईल. यामध्ये काहींचं कधीच भरून न येणारं नुकसान होईल; पण हळूहळू परिस्थिती सुधारेल. आपण आपल्या मुलांचे आदर्श आहोत, हे लक्षात ठेवा. त्यामुळं पालक म्हणून तुम्हाला स्वतःची आणि मुलाची काळजी घ्यावीच लागेल.
    First published:

    Tags: Corona hotspot, Coronavirus

    पुढील बातम्या