30 जुलै : 1993 मुंबई साखळी बाँबस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याला आज (गुरूवारी) सकाळी नागपूर कारागृहात फासावर लटकवण्यात आलं. त्यानंतर साडेचार वाजण्याच्या सुमारास मुंबई इथल्या बडा कब्रस्तानमध्ये त्याचा दफन करण्यात आलं.
याकूब मेमनचा मृतदेह दुपारी 12 वाजता इंडिगोच्या फ्लाईटनं मुंबईत आणलं. त्यानंतर काही काळ माहिम इथे नातेवाईकांनी मृतदेहाचं अंत्यदर्शन घेतलं. संध्याकाळी पाच ते साडेपाच दरम्यान दफनविधीची प्रक्रिया चालली.
दरम्यान, याकूबच्या अंत्ययात्रेला होणारी गर्दीलक्षात घेता पोलिसांनी माहिम आणि परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. शहरभरात 35,000 पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++