Home /News /news /

घरगुती गॅस सिलिंडर 150 रुपयांनी होणार स्वस्त?

घरगुती गॅस सिलिंडर 150 रुपयांनी होणार स्वस्त?

14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर 120 ते 150 रुपयांने कमी होण्याची शक्यता आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्या करू शकतात दर कपात.

    नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : एलपीजी सिलेंडरच्या वाढत्या दरामुळे धास्तावलेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 30 नोव्हेंबर रोजी ऑइल मार्केटिंग कंपन्या 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर 120 ते 150 रुपयांनी कमी करण्याची घोषणा करू शकतात अशी माहिती सुत्रांनी न्यूज18 लोकमतला दिली. कच्चा तेलाचे भाव कमी झाल्यामुळे आणि रुपया वधारल्यामुळे ऑइल मार्केटिंग कंपन्या गॅस दर कपातीचा निर्णय घेऊ शकतात. दिल्लीत सद्या सबसिडी न मिळणाऱ्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर 942 रुपये आहे आणि सबसिडी मिळणाऱ्या सिलिंडरचे दर 507 रुपये असे आहेत. दरकपातीबाबतचा हा निर्णय झालाच, तर त्याची अंमलबजावणी लगेच 1 डिसेंबरपासून सुरू होईल अशी माहिती सुत्रांनी दिली. अशापद्धतीनं होऊ शकते दरकपात - सबसिडी मिळणाऱ्या सिलिंडरच्या दरात 15 ते 20 रुपये होऊ शकते कपात - सबसिडी न मिळणाऱ्या सिलिंडरच्या दरात 120 ते 150 रुपये होऊ शकते कपात - नव्या दरप्रणालीची 1 डिसेंबरपासून होऊ शकते अंमलबजावणी सद्या असे आहेत एलपीजी गॅस सिलिंडरचे दर.. - दिल्लीत सद्या नॉन सबसिडीवाल्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 945 रुपये आहे. - तर सबसिडीवाल्या गॅस सिलिंडरची किंमत 507 रुपये आहे. काचेच्या प्लेट उचलून ठेवताना पडल्या अंगावर, श्वास रोखायला लावणार CCTV
    First published:

    Tags: Subsidy

    पुढील बातम्या