VIDEO : शेजाऱ्याच्या घरात चुकून घुसला,जमावाने बेदम चोपला

VIDEO : शेजाऱ्याच्या घरात चुकून घुसला,जमावाने बेदम चोपला

  • Share this:

 उत्तर प्रदेश, 22 जून : चुकून शेजाऱ्याच्या घरात घुसणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. शेजाऱ्याच्या घरात घुसून या तरुणाने महिलेची छेड काढली. त्यामुळे संतापलेल्या जमावाने या तरुणाला बेदम चोप देऊन नग्न धिंड काढली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

VIDEO : सर,आम्हाला सोडून जाऊ नका!,डोळ्यात पाणी आणणारा एक ह्रदयस्पर्शी निरोप सोहळा

चोंचड बंजारा असं आरोपी तरुणाचं नाव आहे. जो आपल्याच समाजाच्या सलमान बंजाराच्या घरात घुसून त्याच्या पत्नीशी अश्लील चाळे करत होता. छेडछाडीला महिलेने विरोध केला आणि आवाज ऐकल्यावर आजूबाजूचे शेजारी धावून आले. त्यांनी महिलेची सुटका केली आणि तरुणाला चांगला चोप दिला. त्यानंतरही लोकांचा राग शांत झाला नाही. संतापलेल्या लोकांनी चोंचडचं तोंड काळ केलं, त्याला चप्पलहार घातला आणि दोरी बांधून त्याची परिसरातून नग्न धिंड काढली.   त्यानंतर आरोपीला लोकांनी स्वत:च पोलिसांच्या ताब्यात दिले.

VIDEO : चालता चालता अचानक काजोल पडते आणि...

खीरीचे एसपी रामलाल वर्मा यांनी सांगितले की, आरोपी चुकीच्या हेतून शेजारणीच्या घरात घुसला होता. आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांनी महिलेच्या पतीची तक्रार नोंदवून घेतली.

First Published: Jun 22, 2018 08:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading