मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /राणेंच्या पैशाला खुनाचा वास तर शिवसेनेचा नेता श्वान परंपरेतला, कोकण पुन्हा तापलं

राणेंच्या पैशाला खुनाचा वास तर शिवसेनेचा नेता श्वान परंपरेतला, कोकण पुन्हा तापलं

'शिवसेनेच्या नादी लागू नका, वेळ पडल्यास भाजपाच्या इतर नेत्यांची कुंडली आपण बाहेर काढू'

'शिवसेनेच्या नादी लागू नका, वेळ पडल्यास भाजपाच्या इतर नेत्यांची कुंडली आपण बाहेर काढू'

'शिवसेनेच्या नादी लागू नका, वेळ पडल्यास भाजपाच्या इतर नेत्यांची कुंडली आपण बाहेर काढू'

 सावंतवाडी 25 डिसेंबर : सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणुकीचं राजकारण चांगलंच तापलं असून शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यानी नारायण राणेंसह भाजपाच्या नेत्यांवर कडाडून टिका केलीय. राणेंसह भाजपाच्या नेत्यांकडून सावंतवाडी निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या पैशाला खुनाचा, खंडणीचा आणि रक्ताचा वास असल्याचा गंभीर आरोप केसरकर यानी केलाय. वेळ पडल्यास भाजपाच्या इतर नेत्यांची कुंडली आपण बाहेर काढू असा इशाराही केसरकर यानी दिलाय. तर या टिकेला उत्तर देताना केसरकर हे श्वान परंपरेतले असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यानी म्हटलय. त्यामुळे 29 डिसेंबरला होणाऱ्या या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जोरदार धुमशान सुरु झालंय.

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तिथे नारायण राणे यांचाही प्रभाव आहे. भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर कोकणात राजकीय युद्ध तापलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात नारायण राणे हे भाजपच्या अधिक जवळ गेले तर विधानसभा निवडणुकीत्या आधी त्यांनी आपला स्वाभिमान हा पक्षच भाजपमध्ये विलीन केला.

मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणतात, माझ्याकडेही नाही जन्माचा दाखला पण...

त्यामुळे कोकणात खरा सामना रंगतोय तो राणे विरुद्ध शिवसेना असा. युती तुटल्यानंतर सावंतवाडीत पहिल्यांदाच निवडणूक होतेय. आत्तापर्यंत भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवत असे आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं असून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडत आहेत.

Alert...राज्यात पावसाची शक्यता, थंडीचा जोर ओसरणार?

कोकणातल्या राजकारणात केसरकर आणि नारायण राणे यांचं कधीच सख्य नव्हतं. ते कायम एकमेकांवर जहरी टीका करत असतात. आता राणे भाजपच्या तंबूत गेल्याने शिवसेनेची टीका आणखी तीव्र झालीय. विधानसभा निवडणुकीत नितेश राणे हे भाजपचे कणकवलीचे उमेदवार होते. मात्र शिवसेनेने युती तोडत कणकवलीत आपला उमेदवार उभा केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकेर तिथे प्रचाराला गेले होते. खुद्द देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी शिवसेनेने उमेदवार उभा करू नये असं सांगितलं. तर शिवसेनेसोबत किती दिवस वैर ठेवणार आता समेट केला पाहिजे असा सल्ला राणे यांना दिला होता. मात्र तो समेट घडून आला नाही. नंतर युतीच तुटल्याने आता कोकणात राजकीय युद्ध आणखी रंगण्याची शक्यता आहे.

 

First published:
top videos