लवकरच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सुनील ग्रोवरची एण्ट्री होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याबद्दल निर्मात्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. नुकतेच कपिल आणि सुनील एका पार्टीत एकमेकांच्या समोर आले.
सोहेल खानची पत्नी सीमा खानने तिच्या घरी बर्थडे पार्टी दिली होती. या पार्टीत सलमान खान, यूलिया वंतूर, सुनील ग्रोवर, अरबाज खान, जॉर्जिया एंड्रियानी, अमृता अरोरा आणि बॉबी देओल आले होते.
सीमाच्या बर्थडे पार्टीतच कपिल आणि सुनील समोरासमोर आले. पार्टीत दोघांची भेट तर नक्कीच झाली असेल, पण घरात नेमकी काय बोलले असतील याबद्दल अजून कळू शकले नाही.
कपिलने त्याच्या रिसेप्शनमध्ये सुनील ग्रोवरला आमंत्रण दिले होते. मात्र सुनील रिसेप्शनला गेला नव्हता. सुनीलसोबत आता अनेक गोष्टी सुरळीत झाल्याचं कपिलने मान्यही केलं आहे.
विशेष म्हणजे ‘द कपिल शर्मा सीझन २’ चा निर्माता स्वतः सलमान खान आहे. सुनीलने हा शो करावा अशी सलमानची इच्छा आहे. सलमानच्याच आगामी ‘भारत’ सिनेमात सुनीलची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
सुनील, कतरिना कैफच्याही फार जवळचा मित्र आहे. आता प्रेक्षकांना सलमान खान, सुनीलची एण्ट्री कपिल शर्माच्या शोमध्ये करतो की नाही याची उत्सुकता लागली आहे.