नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी : दिल्लीच्या शाहीन बागेत गोळीबार (Shaheen Bagh Firing) प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कपिल गुर्जर (Kapil Gujjar) हा आम आदमी पार्टीशी संबंधित आहे. इतकेच नव्हे तर आरोपी कपिलचे वडील गजे सिंग हेदेखील आम आदमी पार्टी (AAP) शी संबंधित आहेत. एसआयटीच्या चौकशीत कपिल यांनी स्वत: ही गोष्ट सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले. कपिलने सांगितले की त्यांनी आणि त्याच्या वडिलांनी 2019 च्या सुरुवातीच्या महिन्यात आपचे सदस्यत्व घेतले आहे. आरोपींच्या निवेदनाबाबत गुन्हे शाखेने कोर्टाला माहिती दिली आहे.
पोलिसांच्या गुन्हे शाखेनुसार, कपिल गुर्जरचा मोबाईल फोन आणि तपासात तो पक्षाचा सदस्य असल्याचे उघडकीस आले. तसेच आरोपीच्या मोबाइलवरून काही फोटोही सापडले आहेत. या फोटोंमध्ये आरोपी कपिल गुर्जर आणि त्याचे वडील गजे सिंग आम आदमी पार्टीचे नेते आतिशी आणि आपचे खासदार संजय सिंह यांच्यासोबत दिसत आहेत. त्याचवेळी कपिलचे वडील गजे सिंग हे दिल्लीत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियासोबतच्या फोटोंमध्ये दिसले आहेत. या छायाचित्रांनुसार, कपिल साधारण एक वर्षापूर्वी आम आदमी पक्षाची सदस्यता घेताना दिसत आहे. त्यावेळी कपिल आणि त्याच्या वडिलांसह कपिलचे डझनभर सहकारी आप पार्टीमध्ये दाखल झाले होते.
जो फोटो गुन्हे शाखेच्या हाती लागला आहे त्यामध्ये कपिलने आम आदमी पक्षाची टोपी घातली आहे. कपिल सध्या गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. गोळीबारानंतर कपिलने त्याचे व्हॉट्सअॅप डिलीट केले. क्राइम ब्रँचने फोनवरून व्हॉट्सअॅप चॅट व इतर गोष्टी जप्त केल्या आहेत आणि त्यांच्या आधारेच हा खुलासा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 30 जानेवारी रोजी कपिल दुचाकीवरून मित्र सार्थकसमवेत शाहीन बागेत पोहोचला होता आणि दोन फैऱ्या झाल्या. सद्यस्थितीत गुन्हे शाखा सार्थकवर विचारपूस करत आहे.
इतकेच नव्हे तर कपिलचे वडील गजे सिंग हेदेखील बसपाचे सदस्य होते, हे उघडकीस आले आहे. 2008 मध्ये त्यांनी बसपच्या तिकिटावर जंगपुरा येथून आणि 2012 मध्ये एनसीडीमध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. शाहीन बागेत पोहोचल्यानंतर कपिलने आपला मोबाईल व दुचाकी सार्थकला दिली आणि नंतर गोळीबार केला. तेथूनच पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्याकडून शस्त्रेही जप्त केली. याशिवाय सीसीटीव्हीमधूनही काही पुरावे सापडले आहेत, त्यानुसार कपिल त्याच्या कपड्यांमधून पिस्तूल घेऊन जाताना दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aam aadmi party