मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

3 दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड होते कोरोना पॉझिटिव्ह, राष्ट्रवादी नगरसेवकाचा धक्कादायक खुलासा

3 दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड होते कोरोना पॉझिटिव्ह, राष्ट्रवादी नगरसेवकाचा धक्कादायक खुलासा

  • Published by:  Manoj Khandekar
मुंबई, 14 एप्रिल : राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांची कोरोना झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या, पण माझी टेस्ट निगेटिव्ह आल्याचं त्यांनी स्वत: माध्यमांना स्पष्ट केलं. या सगळ्या गोंधळात आता एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. जितेंद्र आव्हाड करोना पॉझिटिव्ह होते असा गंभीर खुलासा ठाणे मनपा राष्ट्रवादी नगरसेवक मिलिंद पाटील यांनी केला आहे. 'तीन दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांचे करोना रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले होते. पण तीन दिवसांत उपचार करून त्यांची दोन चाचण्या अवघ्या तीन दिवसांमध्ये निगेटिव्ह आल्या आहेत. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व 7 ते 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जितेंद्र आव्हाड हे आता क्वारंटाईनमध्ये आहेत. आव्हाडांच्या व्हिडिओनंतर जनतेसमोर येण्याचं कारण म्हणजे, ते म्हणाले की, मी जनतेला जी रोज मदत करत आहे. ती करू शकत नाहीये. याची आम्हालाही खंत आहे.' असं मिलिंद पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले की,'आव्हाडांच्या मदतीने आम्ही खूप लोकांपर्यंत मदत पोहोचवत होतो. आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. म्हणून आमचीही चाचणी करून आम्हाला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण हा संसर्गाचा प्रसार थांबवण्यासाठी दुर्दैवाने आम्हाला हे काम थांबवावं लागेल' Lockdownच्या शेवटच्या दिवशी PM मोदी करणार देशाला संबोधित, सुरू होऊ शकतात या सेवा होम क्वारन्टाइन झाल्यानंतर पहिल्यांदाच काय बोलले जितेंद्र आव्हाड 'सुदैवाने माझ्या टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तरीही प्रोटोकॉलनुसार मला आता किमान 14 दिवस होम क्वारन्टाइन व्हावे लागणार आहे. जी की अत्यावश्यक बाब आहे,' अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती. 'जितेंद्र आव्हाड आणि इतर काही लोक हे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आले. त्यानंतर आव्हाड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारन्टाइन करून घेतलं आहे. ठाण्यातील या कोरोना पॉझिटिव्ह PSI च्या संपर्कात अनेक पत्रकारही आले आहेत. त्या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यातील एक पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यानंतर आता सर्वांना क्वारन्टाइन करण्यात आलं आहे,' अशी माहिती आज सकाळी समोर आली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. लॉकडाऊनमध्ये Family Planning चा विचार, सावधान! 'मी पुन्हा येईन...', नक्की काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? "हो,काल माझी देखील कोव्हीड 19 ची टेस्ट करण्यात आली.माझ्या सोबत काम करणाऱ्या एका पोलीस सहकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. यात माझा देखील समावेश होता. माध्यमात या बातम्या आल्या आणि अनेकांचे फोन आणि मेसेजेस येत आहेत. आपण माझ्यावर जे प्रेम आणि विश्वास नेहमीच दाखवता त्याबद्दल मी आपला आभारी आहे." "दुःख एका गोष्टीच वाटत की,लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर कळवा मुंब्रा भागात मी अन्नाची पाकीट गरजूंना वाटत होते.त्या मी रोज स्वतःच्या निरीक्षणाखाली बनवून घेत होतो.आता पुढील 14 दिवस ते शक्य नाही. तरी माझे सहकारी हे काम थांबवणार नाहीत, याची मी हमी देतो." "कळवा,मुंब्रा,सोलापूर आणि माझ्या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना विनंती आहे की,कृपा करून घरी बसा.आणि आपली तशीच आपल्या परिवाराची काळजी घ्या. येत्या 7 दिवसात पुन्हा एकदा कोरोना टेस्ट करण्यात येईल.आणि मला विश्वास आहे की,या टेस्ट चा रिपोर्ट देखील निगेटिव्ह येऊन,लवकरात लवकर तुमच्यामध्ये "मी पुन्हा येईन..!"
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या