जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / जगातील सर्वाधिक स्वच्छ नद्यांमध्ये भारतातील या नदीचंही नाव; छायाचित्रानं वेधलंय सर्वांच लक्ष

जगातील सर्वाधिक स्वच्छ नद्यांमध्ये भारतातील या नदीचंही नाव; छायाचित्रानं वेधलंय सर्वांच लक्ष

जगातील सर्वाधिक स्वच्छ नद्यांमध्ये भारतातील या नदीचंही नाव; छायाचित्रानं वेधलंय सर्वांच लक्ष

काही दिवसांपूर्वी दिल्लीतल्या यमुना नदीवर (Yamuna River) विषारी फेस आढळून आला होता. त्या वेळी पुन्हा एकदा जलप्रदूषणाविषयी जोरदार चर्चा झाली. याचदरम्यान केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने (Ministry Of Jal shakti) एक लक्षवेधी छायाचित्र ट्विटरवर (Twitter) पोस्ट केलं होतं.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : गेल्या काही वर्षांत वायू, जलप्रदूषणाची (Pollution) समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून येतं. वाढत्या प्रदूषणामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. वाढतं औद्योगिकीकरण, शहरीकरणामुळे जलप्रदूषण वाढत आहे. सध्या असेलली नद्यांची (Rivers) स्थिती या अनुषंगाने बोलकी आहे. देशातली प्रमुख गंगा नदी चांगली व्हावी, यासाठी केंद्र सरकारने नमामि गंगे हे विशेष अभियान सुरू केलं आहे. परंतु, देशातल्या अन्य अनेक नद्यांची स्थिती वाईट आहे. वास्तविक नदी हा पर्यावरणातला प्रमुख घटक मानला जातो; मात्र तिच्या स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसतं. काही दिवसांपूर्वी दिल्लीतल्या यमुना नदीवर (Yamuna River) विषारी फेस आढळून आला होता. त्या वेळी पुन्हा एकदा जलप्रदूषणाविषयी जोरदार चर्चा झाली. याचदरम्यान केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने (Ministry Of Jal shakti) एक लक्षवेधी छायाचित्र ट्विटरवर (Twitter) पोस्ट केलं होतं. मेघालयमधल्या एका नदीतून नाव (Boat) चाललेली असून, त्या नदीचं पाणी अत्यंत नितळ आणि स्वच्छ (Clean) असल्याचं त्या फोटोत दिसत आहे. जलशक्ती मंत्रालयानं ट्विट केलेलं हे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ही नदी नेमकी कोणती, ती इतकं स्वच्छ कशी, याबद्दलचं वृत्त आज तकने दिलं आहे.
    जलशक्ती मंत्रालयाने ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, छायाचित्रात जी अत्यंत स्वच्छ नदी दिसत आहे, तिचं नाव उमंगोट नदी (Umngot River) असं आहे. या नदीचं पाणी इतकं स्वच्छ आणि नितळ आहे, की नदीचा तळही दिसत आहे. त्यामुळे बोट पाण्यावर तरंगण्याऐवजी हवेत उडत असल्याचा भास होत आहे. ही नदी भारत-बांग्लादेशाच्या सीमेनजीक असलेल्या आणि आशियातलं सर्वांत स्वच्छ गाव असा बहुमान मिळालेल्या मॉयलननोंगमधून जाते. पुढे ती बांगलादेशातल्या जयन्तिया आणि खासी हिल्सदरम्यान वाहते. या नदीचं पाणी क्रिस्टल क्लिअर म्हणावं इतकं स्वच्छ आहे.
    हे ही वाचा- पीएम मोदींनी ‘Sydney Dialogue’मध्ये केले संबोधित; म्हणाले… जलशक्ती मंत्रालयानं या नदीचं छायाचित्र ट्विट करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, की `ही जगातल्या सर्वांत स्वच्छ नद्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे ही नदी भारतात आहे. तिचं नाव उमंगोट नदी असून, ती मेघालयमध्ये (Meghalaya) शिलॉंगपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे. या नदीचं पाणी इतकं स्वच्छ आणि पारदर्शक आहे, की नाव नदीऐवजी हवेत तरंगत असल्यासारखी भासते. देशातल्या सर्व नद्या अशाच स्वच्छ असत्या तर? मेघालयमधल्या नागरिकांना सलाम!

    जाहिरात

    जलशक्ती मंत्रालयानं शेअर केलेल्या या छायाचित्रातल्या नावेत 5 प्रवासी आहेत. मंगळवारी (16 नोव्हेंबर) सकाळी हे छायाचित्र शेअर करण्यात आलं. या छायाचित्राला आतापर्यंत 22 हजारांहून अधिक लाइक्स (Likes) मिळाले असून, 4 हजारांपेक्षा अधिक जणांनी ते रिट्विट केलं आहे. सध्या हे छायाचित्र सोशल मीडियावर (Social Media) खूप व्हायरल होत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात