'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत प्रेक्षक ज्याची वाट पाहात होते तो क्षण आलाय. अख्खा आठवडा अनाजी पंत आणि कारभारी यांच्यावरचा खटला चालला.
अनाजी पंत आणि कारभाऱ्यांना संभाजी महाराज शिक्षा सुनावतात. अनाजी पंतांना हत्तीच्या पायाखाली दिलं जातं तर काहींचा कडेलोट केला जातो.हे सर्व आपल्याला येत्या आठवड्यात पाहायला मिळणार आहे.
अनाजी पंतांना हत्तीच्या पायाखाली दिलं जातं, हा भाग शूट झालाय. त्याचे एक्सक्लुझिव्ह फोटो आम्हाला मिळालेत.