नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : जगात अशा अनेक घटना घडतात ज्या ऐकून पाहून खऱ्या गोष्टींवरचा विश्वास उडतो. लोक कशावरुन, कधी, काय, कोणाशी खोटं बोलतील किंवा त्यांना फसवतील याचा काही नेम नाही. असाच काहीसा प्रकार समोर आला असून एका तरुणीने सरकारशी खोटं बोलत पैसे घेऊन त्याचा दुसऱ्या गोष्टीसाठी वापर केला. सध्या ही घटना चागंलीच चर्चेत आली असून महिलाही सोशल मीडियावर चर्चेत आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे याविषयी जाणून घेऊया. 31 वर्षीय ग्लॅमरस प्रभावशाली डॅनिएला रेंडनने हे कृत्य केले आहे, याबद्दल जाणून घेतल्यावर लोक आश्चर्यचकित झाले आहेत. मियामीमध्ये राहणारी डॅनिएला रिअल इस्टेट ब्रोकर म्हणून काम करते, परंतु तिने तिचे आयुष्य विलासी बनवण्यासाठी तिच्या कामापेक्षा फसवणुकीवर जास्त विश्वास ठेवला. कोविड रिलीफ फंड मधून तिने लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपये जमा केले, ज्याचा तिने गैरवापर केला**.** हेही वाचा - लग्न मंडपात जाण्याऐवजी वधू पोहोचली भलत्याच ठिकणी, Video होतोय व्हायरल डॅनिएला रेंडन नावाच्या महिलेने कोविड रिलीफ फंडातून 381,000 डॉलर म्हणजेच 3 कोटींहून अधिक किंमत जमा केली. मियामी हेराल्डच्या अहवालानुसार, महिलेने कोविडसाठी पैसै जमा करण्याचं काम सुरु केलं. यामध्ये जमा झालेले पैसे डॅनिएलाने आपले जीवन सुखाने जगण्यासाठी खर्च केले. आता फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या डॅनिएलावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला असून, त्यानंतर तिला 20 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. बनावट कागदपत्रे सादर करून तिनें हे पैसे सरकारी योजनेतून लघुउद्योग आणि पीपीपीच्या नावाने गोळा केले.
दरम्यान, डॅनिएलाचा प्रकार समोर असून नेटकरी तिच्यावर निशाणा साधत आहे. तिला प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. 2021 मध्ये बेंटले कार भाडेतत्त्वावर घेण्यासाठी या पायांचा वापर केल्याचा आरोप डॅनिएलावर आहे. त्यानंतर तिने स्वत:साठी एक आलिशान अपार्टमेंटही भाड्याने घेतले आणि महागडे कपडे आणि डिझायनर शूज जमा करून आपले आयुष्य लग्झरीयस बनवले. इतकंच नाही तर डॅनिएलाने या पैशाचा वापर तिची कॉस्मेटिक सर्जरी करून स्वतःला सुंदर बनवण्यासाठीही केला.