बंगळुरू, 18 मार्च : लग्न म्हटलं की एक प्रेमाचं आणि विश्वासाचं नात असतं. लग्नानंतर पहिली रात्र म्हणजेत मधुचंद्र हा प्रत्येकाच्या आयुष्यात खास असतो. पण मधुचंद्राआधीच असं काही झालं की ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. लग्नाच्या अगदी दोन दिवसांनंतर पतीने पत्नीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पतीने स्वत:च्याच मोबाइलवर पत्नीचा एका दुसऱ्या पुरुषासोबत अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची जमिन हादरली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या दोन दिवसांनंतर पतीने मोबाइलवर पत्नीचा एका पुरुषासोबत पॉर्न व्हिडिओ पाहिला. इतकंच नाही तर त्यावर एक नंबरही दिला होता. पतीने त्या नंबरवर कॉल केला असता एका अज्ञात पुरुषाने फोन उचलला आणि मी तुझ्या पत्नीचा प्रियकर असल्याचं पुरुषाने सांगितलं. तर तुमचा साखपरपूडा झाल्यानंतरही आमचे संबंध होते आणि आताही आहेत असंही तो म्हणाला. हे सगळं ऐकल्यानंतप पतीला मोठा धक्का बसला.
पतीने या सगळ्याचा पुरावा मागितला असता फोनवरील पुरुषाने लगेच पतीला मोबाइलवर त्यांच्यातील संभाषणाचे फोटो पाठवले. ते वाचल्यानंतर पतीला मोठा मानसिक त्रास झाला. तू मला माझ्या कुटुंबासारखा प्रिय आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, असं त्या मेसेजमध्ये लिहण्यात आलं होतं. हे सगळं वाचल्यानंतर पतीचा पारा चढला आणि त्याने थेट पत्नीची पोलिसांत तक्रार दाखल केली.
हे सगळं प्रकरण बंगळुरूमधलं आहे. हे दोघे विवाहित कर्नाटकमध्ये राहण्यासाठी होते. पती हा एका खासगी कंपनीत कामाला होता. विवाह झाल्यानंतर नव्या आयुष्याची स्वप्न पाहण्याधीच सगळ्या स्वप्नांचा चुरा झाला. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांत पत्नीविरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर पोलीस पुढील संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.