मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

WhatsApp ची प्रायव्हसी पॉलिसी मान्य नाही? असं करा अकाऊंट डिलीट

WhatsApp ची प्रायव्हसी पॉलिसी मान्य नाही? असं करा अकाऊंट डिलीट

व्हॉट्सअॅप प्रायव्हसी पॉलिसीवरून (WhatsApp Privacy Policy) सुरू असलेला गोंधळ अद्याप संपण्याची चिन्हं नाहीत. 15 मेपूर्वी व्हॉट्सअॅपची प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारणं बंधनकारक आहे; मात्र तोपर्यंत जे युझर्स प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचं व्हॉट्सअॅप अकाउंट तातडीने डिलीट केलं जाणार नाही.

पुढे वाचा ...

मुंबई, 12 मे : व्हॉट्सअॅप प्रायव्हसी पॉलिसीवरून (WhatsApp Privacy Policy) सुरू असलेला गोंधळ अद्याप संपण्याची चिन्हं नाहीत. 15 मेपूर्वी व्हॉट्सअॅपची प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारणं बंधनकारक आहेमात्र तोपर्यंत जे युझर्स प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारणार नाहीतत्यांचं व्हॉट्सअॅप अकाउंट तातडीने डिलीट केलं जाणार नाहीअसं फेसबुकने स्पष्ट केलं आहे. (व्हॉट्सअॅप ही फेसबुकच्या मालकीची कंपनी आहे.) मात्र प्रायव्हसी पॉलिसी (Privacy Policy) स्वीकारली नाहीतर त्या युझर्सना व्हॉट्सअॅप अकाउंटवर अनेक महत्त्वाची कामं करता येणार नाहीत. थोडक्यात,काही कृतींचा त्यांचा अॅक्सेस काढून घेतला जाणार आहे. चॅट लिस्टनोटिफिकेशन्सकॉल्स आदींचा त्यात समावेश आहे. म्हणजे तुमचं अकाउंट डिलीट होणार नसलंतरी ते तुम्हाला वापरताही येणार नाही. मग प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारायची नसेलतर अकाउंट डिलीट केलेलं काय वाईट! हे अकाउंट डिलीट करून टेलिग्राम किंवा सिग्नलसारखी अन्य अॅप्स वापरता येऊ शकतातपण व्हॉट्सअॅपचं (WhatsApp Account) तुमचं अकाउंट (अँड्रॉइड किंवा अॅपल) डिलीट करायचं असलंतरी ते15मे पूर्वीच करणं आवश्यक आहे.

अकाउंट डिलीट (WhatsApp Account Delete) करण्यापूर्वी तुमच्याबद्दलची व्हॉट्सअॅपकडे असलेली सगळी माहिती मिळवणं गरजेचं आहे. त्यासाठी एखाद-दोन दिवस लागू शकतात. त्यासाठी व्हॉट्सअॅप ओपन करून सेटिंग्जमध्ये (Settings) जावं. सेटिंग्जमध्ये गेल्यावर अकाउंट (Account) या पर्यायावर टॅप करावं. त्यात तुम्हाला Request Account Info हा पर्याय दिसेल. तो पर्याय सिलेक्ट करावा आणि अॅक्सेप्ट करावा.

त्यानंतर एखाद-दोन दिवसांत व्हॉट्सअॅप तुमच्याबद्दलच्या माहितीचा रिपोर्ट तयार ठेवील आणि तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. नोटिफिकेशन आलं नाही तर तुम्ही एक-दोन दिवसांनी सेटिंग्जमधल्या या ऑप्शनमध्ये पुन्हा येऊन एक्स्पोर्ट रिपोर्ट (Export Report)ऑप्शन निवडावा. ती HTMLफॉरमॅटमधली फाइल असेल. त्यात तुमच्या अकाउंटची माहिती म्हणजे फोन नंबरकाँटॅक्ट फोन नंबर्सई-मेल अॅड्रेसेसस्टेटसडिस्प्ले फोटोडिव्हाइस डिटेल्स आणि तुमचं सिमकार्ड कोणत्या कंपनीचं आहे अशा प्रकारची माहिती असेल.

त्यानंतर तुम्ही तुमचे महत्त्वाचे मेसेजेसग्रुप्स पाहून त्यापैकी आवश्यक माहितीमीडिया फाइल्स सेव्ह किंवा डाउनलोड करून घेऊ शकता.

आता व्हॉट्सअॅप अकाउंट डिलीट कसं कराल?

त्यासाठी व्हॉट्सअॅप ओपन करावं. त्यात 'सेटिंग्ज'मध्ये जाऊन 'अकाउंट'मध्ये जावं. तिथे तुम्हाला Delete My Account हा पर्याय दिसेल. तो पर्याय सिलेक्ट केल्यानंतर व्हॉट्सअॅप तुम्हाला फोन नंबर रि-व्हेरिफाय करायला सांगेल. त्यानंतर तुम्हाला Delete My Account यावर टॅप करावं लागेल.

यानंतर तुमच्या हातात काहीही राहत नाही. तुमचं व्हॉट्सअॅपवरचं अस्तित्व लगेच संपुष्टात येतं. त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या गुगल ड्राइव्हवर किंवा अॅपल आयक्लाउडवर सेव्ह केलेल्या बॅकअप्सचा अॅक्सेसही मिळत नाहीहे लक्षात घ्यावं.

त्यानंतर90दिवसांच्या काळात व्हॉट्सअॅपकडून अकाउंट डिलीट (Account Delete) करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. या 90 दिवसांत प्रक्रिया सुरू असतानाही तुमची माहिती तुम्हाला व्हॉट्सअॅप अकाउंटवर मिळू शकत नाही. या माहितीच्या काही कॉपीज 90 दिवसांनंतरही बॅकअप स्टोरेजमध्ये राहू शकतात. त्यांचा उपयोग नैसर्गिक आपत्ती किंवा सॉफ्टवेअर एरर आदी घटनांवेळी केला जाऊ शकतो,असं व्हॉट्सअॅप सांगतंमात्र या माहितीत वैयक्तिक ओळखीच्या कोणत्याही खुणा नसतात,जेणेकरून ते कुणाचं अकाउंट होतं हे ओळखता येत नाहीअसंही व्हॉट्सअॅपने स्पष्ट केलेलं आहे.

Link:

First published:

Tags: Privacy, Whatsapp