जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / उन्हात लेकरांची घ्या काळजी! हिंगोलीत उष्माघातानं 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

उन्हात लेकरांची घ्या काळजी! हिंगोलीत उष्माघातानं 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

तापमान 39 अंशापर्यंत जाण्याची शक्यता

तापमान 39 अंशापर्यंत जाण्याची शक्यता

राज्यात उष्माघाताचा आणखी एक बळी! तुमच्या मुलांची कशी घ्याल काळजी

  • -MIN READ Hingoli,Hingoli,Maharashtra
  • Last Updated :

मनीष खरात, प्रतिनिधी हिंगोली : राज्यातील काही जिल्हांमध्ये पारा 41 अंशाहून अधिक आहे. मुंबई, ठाणे, पुणे, भुसावळ, जळगाव सोलापुरात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. या सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे राज्यात उष्माघाताने आणखी एक बळी गेला आहे. हिंगोली जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा चांगराच वाढला. यातच उष्माघात झाल्यामुळे 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. कन्हेरगाव नाका परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली. त्यामुळे तुमच्या मुलांची या वाढत्या उष्णतेमध्ये काळजी घ्या असं आवाहन करण्यात आलं आहे.

बापरे! कडाक्याचे उन्हाचे असेही परिणाम, रातोरात रिकामं झालं अख्खं गाव, काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार नंदिनी शंकर खंदारे या मुलीचं नाव आहे. तिचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती वाशिम येथील खासगी डॉक्टरांनी पालकांना दिली. कन्हेरगाव नाका येथील शंकर खंदारे यांची चिमुकली नंदिनीला उलटी जुलाब आणि अचानक ताप आल्याने त्यांनी वाशिम येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. नंदिनीवर उपचार सुरू होते. ताप तिच्या डोक्यात गेल्याने तिला उष्माघात झाल्याचा दावा डॉक्टरांनी केला. उपचारा दरम्यान या चिमुकलीला मृत्यू झाला. यामुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Heat Wave : सूर्य आग ओकतोय! मुंबईकरांना उन्हाचा तडाखा, ठाणेकरांना चटके पारा 43 अंशांवर

काय आहेत लक्षणं? चक्कर येणे, मानसिक बदल, मळमळ ही प्राथमिक लक्षणं आहेत. जेव्हा शरीराचे तापमान ४०° सेल्सिअसपेक्षा जास्त वाढते आणि शरीराची थंड होण्याची क्षमता नष्ट होते तेव्हा उष्माघात होतो.

News18लोकमत
News18लोकमत

काय काळजी घ्यावी भरपूर पाणी प्या, आपल्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवू नये यासाठी प्रयत्न करा. फळांचा समावेश आहारात करा जास्त घट्ट कपडे घालण टाळा, त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो दुपारी 11 ते 3 यावेळात बाहेर फिरणं शक्यतो टाळाच या वेळेत चुकून बाहेर पडण्याची वेळ आली तर छत्री किंवा स्कार्फने डोकं बांधा थंड पाण्याने हात पाय धुवत राहा आणि उपाशी राहू नका

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात