मुंबई : हिवाळ्यात हातांचे पंजे आणि पायांचे तळवे थंड राहणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे. परंतु उन्हाळ्यातही हात आणि पायांचे तळवे थंड राहत असतील तर ती सर्वसामान्य बाब नाही. अनेक जण ही किरकोळ समस्या समजून, त्याकडे दुर्लक्ष करतात; पण ते एखाद्या मोठ्या आजाराचे संकेत असू शकतात. या समस्येची अनेक कारणं असू शकतात. त्यापैकी एक कारण रक्ताभिसरण अर्थात ब्लड सर्क्युलेशन (blood circulation) योग्य नसणं हे आहे. जेव्हा शरीरात ब्लड सर्क्युलेशन कमी होतं, तेव्हा हात व पायाचे तळवे थंड होऊ लागतात. त्यामुळे शरीराचं तापमानही कमी होऊ शकतं. ही समस्या कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकते. विशेषत: मधुमेह आणि कोलेस्टेरॉलने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना याचा जास्त धोका असतो. या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात, त्याबद्दल माहिती घेऊ या. हातमोजे आणि मोजे घाला ‘मेडिकल न्यूज टुडे’ने दिलेल्या माहितीनुसार, हाताचे व पायाचे तळवे थंड होणं हे रेनॉडच्या आजाराचं लक्षण असू शकतं. यामध्ये बोटं आणि अंगठ्याशिवाय काही वेळा नाक आणि कान पांढरे किंवा निळे होतात आणि सुजतात. खूप थंड ठिकाणी राहणाऱ्यांना हा आजार अनेकदा होतो. अशा वेळी अतिरिक्त हातमोजे आणि मोजे घालून रक्तवाहिन्या सर्वसामान्य स्थितीत आणल्या जाऊ शकतात. गरम फूटबाथ हात आणि पायाचे तळवे गरम करण्यासाठी गरम फूटबाथचा वापर केला जाऊ शकतो. फूटबाथ घेतल्याने हात आणि पायांमध्ये होणारं रक्ताभिसरण वाढू शकतं. नियमित 10 ते 15 मिनिटं फूटबाथ घेता येतो. त्यामुळे तणाव दूर होऊन स्नायूंना आराम देण्यास मदत होते. आल्याचं सेवन करा आलं खूप गरम असतं. त्यामुळे रक्ताभिसरण वाढवण्यास मदत करतं. हात आणि पायाचे तळवे गरम राखण्यासाठी आल्याचं नियमित सेवन केल्याचा उपयोग होऊ शकतो. यासाठी आल्याच्या चहाचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. हात आणि तळवे थंड होण्याबरोबरच इतर काही लक्षणं दिसू लागल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. हातांचे पंजे आणि पायांच्या तळव्यांचं तापमान कायम सर्वसामान्य स्थितीत असायला हवं. तसं ते नसेल, तर गांभीर्याने घ्या आणि तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण दुर्लक्ष केल्यास गंभीर आजारांचा धोका उद्भवू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.