जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / Home Loan महागणार; HDFC बँकेकडून व्याजदरात वाढ, ग्राहकांचे EMI वाढणार

Home Loan महागणार; HDFC बँकेकडून व्याजदरात वाढ, ग्राहकांचे EMI वाढणार

Home Loan महागणार; HDFC बँकेकडून व्याजदरात वाढ, ग्राहकांचे EMI वाढणार

HDFC च्या नवीन ग्राहकांसाठी 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याज दर 6.8 टक्के असेल, तर 30 लाखांपेक्षा जास्त आणि 75 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी हा दर 7.05 टक्के असेल. 75 लाखांवरील दर 7.15 टक्के आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 मे : स्वस्त गृहकर्जाचे (Home Loan) दिवस हळूहळू संपत असल्याचे दिसत आहे. देशातील आघाडीच्या गृहनिर्माण कर्जदार HDFC Ltd ने रविवारी आपल्या बेंचमार्क कर्जाच्या दरात 0.05 टक्क्यांनी वाढ केली. यामुळे कंपनीकडून कर्ज घेतलेल्या विद्यमान ग्राहकांसाठी मासिक हप्ता (EMI) वाढेल. रविवारपासून नवे दर लागू झाले आहेत. मात्र, नवीन ग्राहकांसाठी दर बदललेले नाहीत. याआधी एसबीआय (SBI) आणि बँक ऑफ बडोदानेही (Bank of Baroda) कर्जाचे दर (Interest Rate) वाढवले ​​होते. HDFC च्या नवीन ग्राहकांसाठी 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याज दर 6.8 टक्के असेल, तर 30 लाखांपेक्षा जास्त आणि 75 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी हा दर 7.05 टक्के असेल. 75 लाखांवरील दर 7.15 टक्के आहे. “HDFC ने 1 मे 2022 पासून गृह कर्जावरील रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) 0.05 टक्क्यांनी वाढवले ​​आहे,” असं कंपनीने रविवारी सांगितले. तुमचं जन धन खातं आधार कार्डशी लिंक करा आणि मिळवा 1.3 लाखांचा फायदा, चेक करा प्रोसेस त्याच वेळी, नवीन महिला ग्राहकांसाठी 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी आरपीएलआर 6.75 टक्के, नवीन महिलांसाठी 30 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी 7 टक्के, तर 75 रुपयांपेक्षा जास्त किरकोळ प्राइम लेंडिंग दर 7.15 टक्के असेल. येत्या काही महिन्यांत रिझर्व्ह बँक व्याजदरांबाबत कठोर भूमिका घेईल, अशी अपेक्षा आहे. याचे कारण भू-राजकीय तणावामुळे महागाईला आळा घालणे हे त्यांचे प्राधान्य आहे. देशात टप्प्याटप्प्याने सोने हॉलमार्किंग अनिवार्य होणार; घरातील जुन्या हॉलमार्किंग नसलेल्या दागिन्यांचं काय होणार? व्याजदर सर्वात कमी पातळीवर रिझव्‍‌र्ह बँकेच्या गेल्या महिन्यात झालेल्या पतधोरण बैठकीत चलनवाढीबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर व्याजदर वाढवण्याची प्रक्रिया सुरूच आहे. मध्यवर्ती बँकेने वाढीला चालना देण्यासाठी महागाईला तोंड देण्यासाठी धोरण आखले आहे. अत्यंत लवचिक चलनविषयक धोरण आणि अतिरिक्त तरलता यामुळे व्याजदर गेल्या दोन वर्षांपासून सर्वकालीन नीचांकी पातळीवर आहेत. त्यामुळे अनेक कर्ज देणाऱ्या कंपन्या 6.5 टक्क्यांपेक्षाही कमी दराने गृहकर्ज देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात