मुंबई, 24 नोव्हेंबर : आज मार्गर्शीर्ष महिना सुरू होत असून पहिला दिवस गुरुवारचा आला आहे. महालक्ष्मी व्रतासोबतच हा दिवस भगवान विष्णू आणि देव गुरु बृहस्पती यांची पूजा करण्याचा दिवस आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि गुरूच्या मंत्रांचा जप केल्याने जीवनात यश, सुख, समृद्धी, ऐश्वर्य यासह सर्व प्रकारचे सुख मिळू शकते. भगवान विष्णूच्या कृपेनेच सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. या दिवशी भगवान विष्णू आणि देव गुरु बृहस्पती यांची पिवळी फुले, अक्षता, धूप, दीप, पिवळे वस्त्र, तुळशीची पाने, पंचामृत इत्यादींनी पूजा करावी. त्यानंतर आसनावर बसून विष्णु मंत्र किंवा गुरु मंत्राचा किमान एक जपमाळ किंवा 108 वेळा जप करावा. भगवान विष्णूची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात. सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीने एकत्र उपवास आणि पूजा करावी. त्यांनी पूजा केल्याने शुभ विवाह किंवा इतर शुभ कार्ये घडतात, असे मानले जाते. जर तुम्ही गुरुची उपासना केली तर कुंडलीतील गुरू ग्रह बलवान बनेल, ज्यामुळे यश मिळेल. सामर्थ्य आणि कीर्ती वाढेल. गुरूच्या बळामुळे विवाहातील विलंब किंवा अडचणी दूर होतात. यासाठी तुम्ही गुरूच्या बीज मंत्राचा जप करू शकता. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांनी गुरुवारी जप करावयाच्या मंत्रांविषयी दिलेली माहिती पाहुया. 1. गुरु ग्रह बीज मंत्र ओम बृं बृहस्पतये नम: 2. गुरु ग्रह तांत्रिक मंत्र ओम ग्रां ग्रीं ग्रौं स: गुरवे नम: 3. गुरुचा वैदिक मंत्र ओम बृहस्पते अति यदर्यो अर्हाद् द्युमद्विभाति क्रतुमज्जनेषु। यद्दीदयच्छवस ऋतप्रजात तदस्मासु द्रविणं धेहि चित्रम्।। 4. सुख, समृद्धी-संपत्तीसाठी विष्णु मंत्र ओम भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर। भूरि घेदिन्द्र दित्ससि। ओम भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्। आ नो भजस्व राधसि। 5. सर्व मनोकामना पूर्तीसाठी विष्णु मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याला भगवान विष्णूचा महामंत्र देखील म्हणतात. त्याच्या नामजपानेही मोक्ष प्राप्त होतो.
6. भगवान विष्णुचा गायत्री मंत्र ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात्।। मंत्राचा जप करण्यासाठी पुरेसा शांत वेळ देणं आणि योग्य उच्चारण आवश्यक आहे. तरच मंत्रोच्चाराचा उद्देश सफल होऊ शकतो. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर दर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा. त्या वेळी विष्णू चालीसा पाठ करा आणि त्यांची आरती करा. असे केल्याने त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मी व्रताबरोबरच विष्णू मंत्र म्हणणे अधिक लाभदायी ठरेल. वाचा - हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)